पाकिस्तानकडून भारताच्या नियंत्रण रेषा परिसरात हमास पॅटर्नने एकामागोमाग ड्रोन आणि मिसाईलचा मारा केला. कालपासून पाकिस्तानने भारताच्या १४ शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने हे सर्व हल्ले नेस्तनाबूत केले. पाकिस्तानचे चांगलेच तोंड ठेचले. पाकड्यांनी भारताच्या ८ शहरांवर हल्ला केला. त्यांच्या नांग्या ठेचण्यात आल्या. गुरुवारी पाकड्यांनी जम्मू, पठाणकोट, उधमपूर, जैसलमेर, पोखरण, जालंधर आणि भुज या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकड्यांनी केला. पण त्यांना माती खावी लागली.
भारतीय एअर डिफेंस सिस्टिमने हे हल्ले यशस्वीपणे परतावून लावण्यात आले. पंजाबमधील भटिंडा येथे आज सकाळी ४ वाजता ड्रोन हल्ला केला. भारतीय लष्कराने हा हल्ला हाणून पाडला. इतकेच नाही तर पाकिस्तानचे तीन फायटर जेट पाडण्यात आले. यामध्ये JF17 आणि F16 या फायटर जेटचा त्यात समावेश होता.
मिसाईल आणि ड्रोनने केला हल्ला
पाकिस्ताने जम्मू-काश्मीरच नाही तर नियंत्रण रेषेजवळील अनेक गावांवर मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. या हल्ल्यात सीमा रेषेजवळील काही घरांचे नुकसान झाले. त्यामुळे आज सकाळी जम्मू शतवारी मध्ये आकाशात अनेक हालचाली दिसून आल्या. भारतीय लष्कराने या फ्लाईंग ऑब्जेक्टवर गोळीबार केला.
भारतीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाईलद्वारे जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरमध्ये लष्करी तळांना निशाणा करण्याचा प्रयत्न केला. एअर डिफेन्स सिस्टिमने हा हल्ला हाणून पाडण्यात आला. सुरक्षा एजन्सींजने जम्मू विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अरनिया आणि इतर जवळच्या क्षेत्रात पाकिस्तानकडून अनेक मिसाईल, क्षेपणास्त्र डागण्यात आल्या. ही सर्व क्षेपणास्त्र भारताच्या अत्याधुनिक एस ४०० या सिस्टिमने हाणून पाडले. राजौरी आणि पुंछ येथील नियंत्रण रेषेवर मोठे धमाके ऐकू आलेत. तर जम्मू विद्यापीठाजवळ सुद्धा पकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले. सीमा रेषेजवळील गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर भागातील अनेक गावांमध्ये हायअलर्ट जाहीर करण्यात आले आहे. या भागात लष्कर आणि सीमातंर्गत भागात पोलिसांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.