पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. त्याचवेळी अंतर्गत परिस्थितीमुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. बलुचिस्तानमध्ये बलूच आर्मीकडून हल्ले वाढवले आहे. पाकिस्तानचे सरकारी कार्यालये, पाकिस्तानमधील लष्करी जवान यांच्यावर हल्ले केले जात आहे. बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याची मागणी बलूच आर्मीची आहे. बलुचिस्तान पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा आहे.
बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा झाला तर मोठा झटका पाकिस्तानला बसणार आहे. पाकिस्तानमधील सोने आणि तांबे यांचा भंडार संपणार आहे. एका अंदाजानुसार, पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये 5.9 बिलियन टन खनिज, सोने आणि तांबे आहे. बलुचिस्तानची अर्थव्यवस्था किती मोठी आहे? जाणून घेऊ या…
बलुचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. अफगाणिस्तान सीमेला लागून असलेला हा भूभाग पाकिस्तानसाठी रणनैतिकदृष्टीने महत्वाचा आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ बलुचिस्तानचे स्थान असल्याने हा प्रदेश पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बलुचिस्तानमध्ये सोने, तांबे, प्राकृतिक गॅस यासारखे खनिज आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो. परंतु हा भाग पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकिस्तानात गंभीर आर्थिक संकट आहे.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, बलुचिस्तानमध्ये असणारी रेको डिक जगातील सर्वात मोठी अविकसित तांबे आणि सोन्याची खाण आहे. परंतु पाकिस्तान सरकार, बॅरिक गोल्ड आणि एंटोफगास्टा पीएलसी यांच्यातील वादामुळे या खाणीतून सोने काढण्यास सुरुवात झाली नाही.