बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षक या प्रोजेक्ट संबंधित जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. मात्र आमिर खान त्याच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजनंतर 'महाभारत' या ड्रीम प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. आमिर खानचा आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'' चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर' रिलीजनंतर ओटीटीवर पाहता येणार नाही आहे. तर चित्रपट डायरेक्ट युट्यूबवर 'पे-पर-व्ह्यू' च्या स्वरूपात पाहता येणार आहे. 'सितारे जमीन पर' सिनेमा रिलीजनंतर दोन महिन्यांनी युट्यूबवर पाहता येईल. खानने 'सितारे जमीन पर' चित्रपट ओटीटीवर न घेऊन येता. थेट युट्यूबवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रेक्षकांना स्ट्रीमिंग प्रीमियरची वाट पाहण्यापासून परावृत्त करून सिनेमॅटिक अनुभव टिकवून ठेवण्यासाठी 'सितारे जमीन पर' चित्रपट रिलीज न करता युट्यूबवर 'पे-पर-व्ह्यू' च्या स्वरूपात दाखवण्यात येणार आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान बास्केटबॉल शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
आमिर खान आणि जिनिलिया देशमुखसोबत चित्रपटात आरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी आणि सिमरन मंगेशकर हे कलाकार देखील झळकणार आहेत. 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सिक्वेल 'सितारे जमीन पर' आहे. हा चित्रपट कुटुंबासोबत नक्की पाहावा. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे.