Rolls Royce, जग्वार स्वस्तात खरेदी करा, जाणून घ्या
GH News May 10, 2025 07:08 PM

Rolls Royce : लक्झरी कार देखील परवडणाऱ्या किंमतीत खरेदी करता येणार आहेत. ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या लक्झरी कारवर 100 टक्के कर आकारला जातो. FTA मध्ये हे आयात शुल्क कमी करून 10 टक्के करण्यात आले आहे. लक्झरी कारची किंमत 2 कोटी रुपये असेल तर FTA नंतर त्याची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये होईल. अशा पद्धतीने Rolls Royce, जग्वार लँड रोव्हर, मॅकलारेन आणि बेंटले सारख्या लक्झरी कार स्वस्तात खरेदी करणे आता आपल्यासाठी सोपे होणार आहे. त्यांची किंमत इतकी कमी असू शकते की तुमचे लाख दोन लाख नव्हे तर 80-90 लाख रुपये वाचू शकतील.

भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. यामुळे ब्रिटनमध्ये तयार झालेल्या कार भारतात आयात करणे सोपे होईल आणि त्यावरील आयात शुल्कही कमी होईल. अशापरिस्थितीत या कारच्या किंमतीत लक्षणीय घट होणार आहे.

कर 100 वरून 10 टक्क्यांवर

सध्या ब्रिटनमधून भारतात आयात होणाऱ्या लक्झरी कारवर 100 टक्के कर आकारला जातो. FTA मध्ये हे आयात शुल्क कमी करून 10 टक्के करण्यात आले आहे. अशा पद्धतीने लक्झरी कारची किंमत 2 कोटी रुपये असेल तर FTA नंतर त्याची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये होईल.

त्यामुळे ग्राहकांची 90 लाख रुपयांची बचत होणार आहे. आयात शुल्क कमी केल्याने देशात लक्झरी कारचा वापर वाढेल. Rolls Royce आणि जग्वार सारख्या कंपन्यांना वाढलेल्या विक्रीचा फायदा होईल.

भारतातील कार कंपन्यांचे फायदे

FTA चा फायदा केवळ ब्रिटनच्या कार कंपन्यांनाच होणार नाही. टाटा मोटर्स आणि महिंद्रा सारख्या कंपन्यांनाही ब्रिटनच्या बाजारपेठेत सहज प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर या कंपन्यांच्या गाड्यांचे सेफ्टी रेटिंग चांगले असल्याने त्यांना तेथे त्यांची विक्री वाढण्यास मदत होणार आहे. या कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने ब्रिटनच्या बाजारपेठेत चांगल्या किमतीत विकू शकतात.

‘या’ कंपन्यांच्या गाड्या भारतात येणार

भारताने कंप्लीट बिल्ट युनिट म्हणून आयात होणाऱ्या वाहनांवरील कराचा दर कमी केला आहे. मात्र, या नियमांतर्गत ठराविक मर्यादेच्या आत उत्पादित वाहनांचीच आयात करता येणार आहे.

‘या’ करारानंतर Rolls Royce, बेंटले, जग्वार लँड रोव्हर, लोटस, अॅस्टन मार्टिन आणि मॅकलारेन यांची वाहने भारतात आणणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर बीएसए, नॉर्टन आणि ट्रायम्फ सारख्या दुचाकीही स्वस्तात भारतात येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.