तिमाही निकाल, भारत-पाक तणाव, महागाईचा डेटा, जागतिक संकेत हे ट्रिगर असतील शेअर बाजारांसाठी महत्वाचे
Stocks Market This Week :भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या भू-राजकीय तणावादरम्यान कंसोलिडेशनच्या टप्प्यानंतर शुक्रवारी शेअर बाजारात (९ मे) तीव्र घसरण नोंदवली गेली आणि तीन आठवड्यांच्या तेजीला ब्रेक लागला. येत्या आठवड्यात गुंतवणूकदार आठवड्यात बाजारातील काही प्रमुख घटकांवर लक्ष ठेवतील. आर्थिक वर्ष २०२४-२५ (Q4FY25) च्या मार्च तिमाही निकालांचा पुढील टप्पा, देशांतर्गत आर्थिक आकडेवारी, किरकोळ महागाई, भारत-पाकिस्तान भू-राजकीय तणाव, परकीय भांडवलाचा प्रवाह आणि जागतिक संकेत या आठवड्यातील बाजाराचा कल निश्चित करतील. भारतीय शेअर बाजारातील ट्रेंडगेल्या आठवड्यात देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी ५० मध्ये १.४ टक्क्यांनी घसरण झाली, सीमा संघर्षामुळे शेअर बाजारातील अस्थिरतेला चालना मिळाल्याने आणि जोखीम कमी करण्याच्या भावनेकडे वळल्यानंतर बाजारात दबाव निर्माण झाला.शुक्रवारी निफ्टी ५० निर्देशांक १.१ टक्क्यांनी घसरला परंतु मानसिकदृष्ट्या २४,००० अंकांच्या वर बंद झाला, तर बीएसई सेन्सेक्स देखील १.१ टक्क्यांनी घसरला परंतु ८०,००० च्या खाली बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १,०४७ अंकांनी घसरून ७९,४५४ वर स्थिरावला, तर निफ्टी ५० निर्देशांक ३३८ अंकांनी घसरून २४,००८ वर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे १.४ टक्के साप्ताहिक तोटा झाला. बुधवारी (७ मे) भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (POK) आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. "सुरुवातीला, भारत-यूके मुक्त व्यापार कराराबद्दल आशावाद आणि निवडक निर्देशांक दिग्गजांकडून अपेक्षेपेक्षा जास्त तिमाहीतील कमाईमुळे बाजारातील भावना उत्साहित झाल्या होत्या. परंतू वाढत्या लष्करी तणावामुळे बाजाराच्या मूडवर मोठा परिणाम झाल्याने नंतर वाढ कमी झाली," असे मास्टर ट्रस्ट ग्रुपचे संचालक पुनीत सिंघानिया म्हणाले. या आठवड्यात आयपीओ बाजारातील घडामोडीयेत्या आठवड्यात प्राथमिक बाजारात म्हणजे आयपीओ बाजारात अधिक उत्साह दिसून येईल, काही आयपीओ मुख्य बोर्ड तर काही लघु आणि मध्यम उद्योग (SME) विभागांमध्ये लिस्टिंग होणार आहे. देशांतर्गत आणि तांत्रिक दृष्टिकोनातून हा आठवडा महत्त्वाचा असेल. गुंतवणूकदार देशांतर्गत समष्टि आर्थिक डेटा, भू-राजकीय घटना आणि तिमाही निकालांवर लक्ष ठेवतील.