Maharashtra Live News Update: तरुणीच्या बहिणीला इंस्टाग्रामवर मॅसेज कुटुंबियांकडून तरुणाचे अपहरण करत हत्या
Saam TV May 12, 2025 01:45 PM
तरुणीच्या बहिणीला इंस्टाग्रामवर मॅसेज कुटुंबियांकडून तरुणाचे अपहरण करत हत्या

24 वर्षीय तरुणाचे पुण्यातून अपहरण करत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आणून हत्या केल्याची घटना घडली आहे.. इंस्टाग्रामवर मॅसेज पाठवल्याचा राग धरून तरुणीच्या कुटुंबियांनी हे कृत्य केले असून याप्रकरणी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. तरुणाचे अपहरण करून त्याला ओढत नेत असल्याचे सीसीटिव्ही फुटेज समोर आलं असून कोपरगाव पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर अजित पवार यांनी देगलूर येथे शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

बीड जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्यांचे प्रकल्प राबवले जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीवर पवनचक्क्या उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, आता या शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

खंडोबा मंदिरात डाळिंबाची सजावट

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात विशेष सजावटीचा कार्यक्रम पार पडला. मुख्य गाभाऱ्यात तब्बल १००० किलो डाळिंबांचा वापर करून देवालयाची आकर्षक सजावट करण्यात आली.

बुलढाण्यात मुसळधार पावसाची बॅटींग, नागरिकांचे हाल

बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने उकाडा कमी झाला असून हवेत थोडाफार गारवा निर्माण झाला आहे. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची तारांबळ

लातूर शहरासह ग्रामीण भागात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सकाळ पासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, त्यानंतर मेघगर्जनेसह तुफान पाऊस झाला. दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात, नागरिकांची तारांबळ

नाशिकमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून, नाशिक शहरासह इतर भागात देखील मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. विजेच्या कडकडासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची देखील चांगली तारांबळ उडालाच पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असून, अधिक नुकनास होण्याची शक्यता आहे.

पुण्यात भरधाव थारने पार्किंग केलेल्या दुचाकी उडवल्या

भरधाव थारने पार्किंग केलेल्या दुचाकी उडवल्या

पुण्यातील "थार" चा थरार सी सी टिव्ही मध्ये कैद

अपघातात सुदैवाने कोणी ही जखमी नाही, मात्र दुचाकींचे मोठे नुकसान

अपघात घडल्यानंतर थार चालक वाहनासह गेला पळून

पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, गाडी मालकाचा शोध सुरू

भारतीय सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रभू वैद्यनाथाला नागरिकांचा रुद्राभिषेक

भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याला यश आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी परळीतील नागरिकांकडून ज्योतिर्लिंग वैद्यनाथाला रुद्राभिषेक करण्यात आला.रुद्राभिषेकानंतर वैद्यनाथाला महाआरती देखील करण्यात आली.गेल्या काही दिवसात भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.

आज दोन्ही देशांमध्ये शस्त्र संधी झाली असली तरी भविष्यात पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध झाल्यास भारतीय सैन्याला बळ मिळावे आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी हा रुद्राभिषेक करण्यात आला.या रुद्राभिषेकासाठी देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने वैद्यनाथ मंदिरात उपस्थित होते. अभिषेकानंतर मंदिर परिसर भारत माता की जय च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

हॉर्न वाजवल्याने बस चालकाला बेदम मारहाण, बसच्या काचाही फोडल्या

- बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील घटना.

- हॉर्न वाजवल्याने टेम्पो चालकाने बस चालकाला केली बेदम मारहाण.

- पोलिसांना माहिती दिल्याचं समजतात टेम्पो चालक फरार.

- झालेल्या वादामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

- पेठ बीड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.

- बस चालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

भारत - पाकिस्तान दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांचा सुरक्षेसाठी निर्णय

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव तणावग्रस्त परिस्थिती पाहता देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी काळजी घेतली जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची कसून तपासणी केली जात आहे.

भाविकांच्या बरोबर असलेल्या बॅग आणि महिला भाविकांच्या जवळ असलेल्या पर्स मंदिरामध्ये नेण्यास बंदी करण्यात आली आहे.

यासंदर्भात तुळजाभवानी मंदिर संस्थांनी मंदिर परिसरामध्ये अशा सूचनांचे बॅनर देखील लावले आहेत.

सैनिकांच्या सुरक्षेसाठी उपरीत महाआरती

पहलगाम घटनेने नंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिक सुरक्षीत राहावेत यासाठी पंढरपूर जवळच्या उपरी येथील ग्रामस्थांनी आज ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाआरती केली.

येथील अनेक तरूण भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. युध्दामध्ये भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत महाआरती केली. यावेळी ग्रामस्थांनी पाकिस्तान मर्दाबाद अशा घोषणी ही दिल्या.

भारताने पाकिस्तानचा कायमचा बिमोड करावा अशी मागणी सैनिकांच्या माता पित्यांनी केली

Solapur: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड

तर उपसभापती पदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड

सभापती आणि उपसभापती दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने दोन्ही निवड बिनविरोध जाहीर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये थेट लढाई झाली होती

या लढतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचा एकतर्फी विजय झाला होता

त्यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड होणार याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती

आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने सभापती पदी आणि भाजप नेते सुनील कळके यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली

निवड जाहीर होताच भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला

यावेळी दिलीप माने आणि सुनील कळके समर्थकांनी मोठा जल्लोष केलाय

संजय राठोडसरकारने पाकिस्तानसोबत बोलणी करताना शिवसेनेच्या 4 मागण्या पुढे ठेऊन बोलणी करावी Nashik: नाशिकच्या मखमलाबाद मध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन

- मानवी वस्तीत बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत

- मखमलाबाद परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेरात कैद

- मग मला बाद शिवार येथील ओमकार पिंगळे यांच्या घरासमोर बिबट्याचा वावर

- गेल्या तीन ते चार दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असल्याची नागरिकांची माहिती

- वनविभागाने पिंजरा लावून उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

कर्जतमधील नेरळ परिसरातील पाषाणे धरणात बुडून दिघी नवी मुंबई येथील एका तरुणाचा मृत्यू

शनिवारी सायंकाळी नेरळ परिसरात असणाऱ्या पाषाणे या धरणावर दिघी नवीमुंबई येथील चार तरुण मित्र पर्यटनास आले होते. ते आंघोळीसाठी धरणात उतरले असता अजय विष्णू रावत वय 28 वर्षे हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला.

रात्री उशिरा पर्यंत त्याचा शोध न लागल्याने खोलीच्या हेल्प फाउंडेशन च्या टीमला पोलिसांनी बोलावले व आज सकाळी 9 वाजता अजयचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले.

भात आणि नाचणी पिकाची उत्पादकता वाढवणार

रायगड जिल्ह्यात 83 हजार 890 हजार हेक्टरवर यंदा खरीपाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात आणि नागली म्हणजे नाचणीचे पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची आणि नाचणी पिकाची उत्पादकता वाढविण्यावर यंदा भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खरिप हंगाम आढावा घेण्यात आला.

शेलुबाजारमध्ये वरली मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड, १२ आरोपींवर गुन्हा दाखल, ३ लाख ४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाशिमच्या शेलुबाजार मध्ये खुलेआम सुरू असलेल्या वरली मटका जुगार अड्ड्यावर वाशिमच्या एस डि पी ओ अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केलीये. या कारवाईत १२ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मागील तीन दिवसात अवैध धंद्यांविरुद्ध ही दुसरी मोठी कारवाई केली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा येथील नदीला भर उन्हाळ्यात पूर

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नदी नाले आता प्रवाहित झाले असून, मोरांबा नदीला पूर आल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

या अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाल्यामुळे मोठं नुकसान झाला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात मोरांबा नदीला पूर आला आहे...

खेड सेझच्या औद्योगिक क्षेत्रात मध्यरात्री गोळीबार

गुन्हेगारी टोळीकडुन गोळीबार करत औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न.

गाड्यांचीही तोडफोड

दोन जण जखमी..जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

हॉटेल दुर्वाकुर मालकाच्या मुलावर गोळीबार

हॉटेल च्या बिल आणि औद्योगिक क्षेत्रात कामांवरुन गोळीबार झाल्याचा पोलीसांचा अंदाज..

राजगुरुनगर पोलीसांनी 8 जणांना ताब्यात घेतले असुन 2 मुख्य आरोपी फरार

खेड सेझच्या औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी वाढत असताना पोलीसांकडुन कारवाई होत नसल्याने गुन्हेगार स्थानिक ठिकाणी दहशत करत असुन राजगुरुनगर पोलीसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं रहालय

माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते मोटारसायकलवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

सांगोला तालुक्यातील नकातेवाडी येथील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील थेट मोटारसायकलवर बसून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले.

येथील शेतकरी टेंभू योजनेच्या पाण्यापासून न् वंचित आहेत. ऐन उन्हाळ्यात याभागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

येथील शेतकऱ्यांनी पाणी मिळावे यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे मागणी केली होती.

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत खासदार मोहिते पाटील यांनी मोटारसायकल वर बसून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी टेंभू योजनेच्या कालव्याची पाहणी करून कालवा दुरूस्त करून तातडीने पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

खासदार मोहिते पाटील यांनी तत्परता दाखवल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण शहरात अतिक्रमणाची जोरदार कारवाई

शहरातील अनेक भागातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा

पुण्यातील प्रसिध्द अशा गुडलक आणि वैशाली हॉटेलवर देखील महापालिकेने चालवलं बुलडोझर

यासह गोयलगंगा, नगररोड, स्वारगेट चौक, शनिवारवाडा परिसरात असणारे अनधिकृत अतिक्रमण महापालिकेने हटवले

महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाच्या निगराणीत शहरभर पुणे महापालिकेचे अतिक्रमणविरोधात कारवाई

पुण्यात पाकिस्तान झिंदाबादची पोस्ट लिहिणाऱ्या इंजिनियर तरुणीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

दोन दिवसांपूर्वी कोंढवा मधून तरुणीला केली होती अटक

आता या तरुणीची एटीएस ही चौकशी करणार का हे पहाव लागणार आहे .

काल पोलिसांनी तरुणीला न्यायालयात हजर करताना घेतली मोठी खबरदारी

तरुणीवर कुठे ही हल्ला होऊ नये यासाठी तरुणीच्याच पेहरावसारखी महिला पोलीस कर्मचारी न्यायालयात हजर केली

पहलगाम येथे हल्ला झाला त्यांनतर संबधित तरुणी श्रीनगर येथे कुटुंबाकडे जाऊन आली होती.

त्यामुळे तरुणी कोणाच्या संपर्कात होती याचा पोलिसांना तपास करायचा आहे त्यामुळे तिची कोठडी मागितली

आणि न्यायालयाने ती मान्य केली आहे

पाण्याच्या शोधात निलगाय राज्य मार्गावर प्रवासी चालकाने केला व्हिडिओ कैद

हिंगोली नांदेड राज्य मार्गावर औंढा परिसरातील जंगली प्राणी पाण्याच्या शोधात चक्क राज्य मार्गावरती येत आहेत औंढा शहराच्या जवळ असलेल्या पावनखिंडीमध्ये पाण्याच्या शोधात आलेल्या नील गाईला अज्ञात वाहनाने धडक देत जखमी केले आहे दरम्यान ही नीलगाय जिवाच्या आकांताने पुन्हा जंगलाकडे पळताना एका वाहन चालकाने व्हिडिओ कॅमेरात कैद केला असून यामुळे जंगलातील प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे वन विभागाने अतिरिक्त उपाययोजना करावी अशी मागणी प्राणि मित्र करत आहेत

गुंड झाले शरीफ, पोलिसांच्या गुंडा रजिस्टरमधून अनेक दशकांनंतर गुन्हेगारांची नावे कमी

हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या रेकॉर्डवर असलेल्या अनेक गुन्हेगारांची नावे गुंडा रजिस्टरमधून पोलीस दलाने कमी केली आहेत,

हिंगोली चे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हाभरात गुन्हेगारी सोडून समाजसेवेकडे वळलेल्या लोकांना पोलिसांचा नाहक त्रास होऊ नये यासाठी विशेष मोहीम राबवली होती

या मोहिमेत न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या आणि मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात एकही गुन्हा दाखल न झालेल्या गुन्हेगारांची नावे पोलिसांच्या गुंडा रजिस्टर मधून कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या

त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील ठाणेदारांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेऊन ही नावे कमी करत गुन्हेगारी कमी केलेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे

रायगड जिल्ह्यातील ५३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित

मागील तीन वर्षात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत अनुदान म्हणून शासनाकडून आलेला 15 कोटी 43 लाख रुपयांचा निधी पडून आहे. त्यामुळे जवळपास 53 हजार शेतकरी हक्काच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी हे प्रकरण समोर आणल असून त्यानंतर आता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

नितीन गडकरींचे सडेतोड वक्तव्य नितीन गडकरीदरवेळी भाजप नेत्याच्या घरावर आणि संघ कार्यालयावर गोटे मारणारी लोक येत होती. पण आज अनुकलूल काळ आला आहे.. काळ बदलला ते दगड मारणारे भाजपमध्ये आली आणि त्यातला एक भाजपचा वार्ड अध्यक्ष झाला. वऱ्हाडाच्या क्रूझरला कंटेनरची धडक

जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा लहासर येथून विवाह सोहळा आटोपून क्रूझरने घराकडे परतत असताना जामनेर-पहर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ समोरून भरधाव येणाऱ्या आयशर कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन क्रूझर उलटली, या भीषण दुर्घटनेत नवरदेवाचे काका दशरथ रतन चव्हाण हे जागीच ठार झाले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आज सभापती आणि उपसभापतीची होणार निवड

- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आज सभापती आणि उपसभापतीची होणार निवड, अनेक जण इच्छुक

- सोलापूर बाजार समिती निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट..

- पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांची संचालक मंडळातील सदस्यांनी घेतली भेट..

- भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर बाजार समितीवर 18 पैकी 14 संचालक निवडून आणत मिळवला होता विजय..

- मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत भेट घेणारे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे हे सभापती पदासाठी इच्छुक..

- भाजप आणि काँग्रेस युती केल्यामुळे राज्यभरात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती..

- भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सभापती निवडीची सर्व जबाबदारी.

-

सांगली.. रेल्वे पुलावर चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात

सांगलीच्या मिरज या ठिकाणी रेल्वेपुलावर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता,की दुचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला तर चार चाकी वाहनाचाही मोठा नुकसान झाला आहे. भराधाव दुचाकीस्वर आणि चार चाकी स्वारा वाहनाच्या मध्ये समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.अपघातामुळे काही वेळ- सांगली-मिरज मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती

सोमवारी पुणे स्टेशन परिसरातील वाहतूकीत बदल

बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोमवारी (ता.१२) पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Maharashtra Live News Update: भारत पाकिस्तान तणावामुळे ‘सीए’च्या परीक्षा लांबणीवर

भारत पाकिस्तान तणावामुळे ‘सीए’च्या परीक्षा लांबणीवर गेली आहे ..आयसीएआयचा हा निर्णय घेतला आहे. देशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे CA अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने घेतला आहे.

९ ते १४ मेदरम्यान होणाऱ्या इंटरमिजिएट, अंतिम व पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्सच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

धाराशिव मध्ये काढण्यात येणारी तिरंगा रॅली रद्द,पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा जिल्हा दौरा ही रद्द

भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी आज धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.माञ भारत -पाकिस्तान सीमावर्ती परिस्थितीत निर्माण झालेल्या ताज्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा व तालुका स्तरावरील रॅली रद्द करण्याचा निर्णय घेतला असुन सुरक्षितता व राष्ट्रीय हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा धाराशिव जिल्हा दौरा देखील रद्द झाला आहे.

सोलापूर - आज पावसाची शक्यता,तर पुढील तीन दिवस यलो अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोलापुरात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२ मे ते १४ मे दरम्यान तीन दिवस यलो अलर्ट ही देण्यात आला आहे.त्यामुळे येत्या दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज हलका ते मध्यम पाऊस पडेल,तर १२ ते १४ मे या तीन दिवसात यलो अलर्ट दिला आहे.या तीन दिवसात सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना,हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात 13 ते 26 मे दरम्यान जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश

धाराशिव जिल्ह्यात आगामी सण उत्सव धार्मिक कार्यक्रम,तसेच विविध मागण्यांसाठी आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेवुन जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 13 ते 26 मे पर्यंत संपुर्ण जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागु केले आहेत.अपर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांनी हा आदेश काढला असुन या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा जमाव,शस्ञ,काठ्या, स्फोटके,मिरवणूका मोर्चे यावर बंदी घालण्यात आली आहे.या काळात कोणताही मोर्चा सभा प्रचार किंवा आंदोलन आयोजित करण्यापुर्वी संबधीत पोलीस अधिकारी यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असुन जिल्ह्यात छञपती संभाजी महाराज जयंती,मराठा ओबीसी आरक्षण,वक्फ कायदा व शेतकरी मागण्या आदी मुद्द्यांवर आंदोलन होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आदेश लागु केला आहे.

जळकोट तालुक्यातल्या नऊ गावांना पाणीटंचाई

लातूरच्या जळकोट तालुक्यातील नऊ गावांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे., जून महिना जसा जसा जवळील तशी तालुक्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होत चालली आहे... या गावांना प्रशासनाच्या वतीने तीन टँकर आणि अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतोय, दरम्यान आणखीन कोणत्या गावात पाणीटंचाई जाणवत असेल तर ग्रामपंचायतीने अर्ज करण्याचा आव्हान तहसीलदार यांनी केले आहे... तालुक्यातल्या शिवाजीनगर तांडा, अग्रवाल तांडा ,रामपूर तांडा, मरसांगवी, होकर्णा आणि जवळपूर यासह इतर गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा आहेत

Maharashtra Live News Update: धागा कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

अल्लीपूर ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका धागा कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना उजेडात आली. याप्रकरणात तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जी.एम. गुरुमूर्ती, मोबीन खान अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.१४ वर्षीय पीडिता धागा कंपनीच्या पॅकिंग खोलीत काम करत असताना आरोपींनी तिच्या डोळ्यात काही तरी टाकून तिला लगतच्या खोलीत नेले. तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही आरोपी कंपनीतच काम करून तेथेच राहत होते. याबाबत पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.