बांगलादेशात काय शिजतंय?; सरकारचा मोठा निर्णय काय?
GH News May 12, 2025 02:07 PM

भारत पाकिस्तान युद्ध सुरु असताना बांगलादेशातही हलचालींना वेग आला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरने हादरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे आवाहन करून भारतापुढे शरणागती पत्करली असतानाच शेजारच्या बांगलादेशात मोठी घटना घडली आहे. तर शेख हसीना यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.

आता खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा (BNP) प्रभाव बांगलादेशात वाढणार असल्याचे दिसत आहे. वैद्यकीय उपचार पूर्ण करून त्या लंडनहून ढाक्याला परतली आहे. त्याचवेळी त्यांच्या पक्षाने युनूस सरकारवर लवकर निवडणुका घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने दहशतवादविरोधी कायद्यानुसार शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगच्या सर्व हालचालींवर बंदी घातली आहे. अवामी लीगच्या प्रमुख माजी पंतप्रधान हसीना यांना काही महिन्यांपूर्वी हिंसक निदर्शनांनंतर राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. तेव्हापासून त्या भारतात राहत आहे. आता कट्टरतावाद्यांच्या दबावाखाली बांगलादेश सरकारने अवामी लीगवर बंदी घालण्याचा मोठा आदेश दिला.

बांगलादेशची सरकारी वृत्तसंस्था BSS ने दिलेल्या वृत्तानुसार, सल्लागार परिषदेने आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अवामी लीग आणि त्याच्या नेत्यांवरील खटला पूर्ण होईपर्यंत दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अवामी लीगच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अवामी लीग सरकारच्या काळात न्यायाधिकरण सर्व आरोपांची चौकशी करेल. जुलै 2024 मध्ये झालेल्या बंडखोरी आंदोलनात सहभागी लोक आणि साक्षीदारांची सुरक्षा आणि तक्रारी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यापुढेही मोठा निर्णय होण्याची शक्यता

देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार परिषदेने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणाच्या विद्यमान कायद्यात सुधारणा केली आहे. त्याअंतर्गत लवादाला आता केवळ व्यक्तींवरच नव्हे, तर संपूर्ण राजकीय पक्ष, त्यांच्या आघाडीच्या संघटना आणि संलग्न संस्थांवर कारवाई करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मुक्ती संग्रामात मोठी भूमिका

अवामी लीगची स्थापना 1949 मध्ये झाली. बांगलादेशात सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या दोन प्रमुख पक्षांपैकी हा एक पक्ष आहे. याच पक्षाने पूर्व पाकिस्तानात बंगालींच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले आणि 1971 च्या मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आता खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा (BNP) प्रभाव बांगलादेशात वाढणार असल्याचे दिसत आहे. वैद्यकीय उपचार पूर्ण करून त्या लंडनहून ढाक्याला परतली आहे. त्याचवेळी त्यांच्या पक्षाने युनूस सरकारवर लवकर निवडणुका घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.