सांगली : येथील शंभर फुटी रोडवरील योगीराज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुशील सुभाष कदम (वय ३२) यांनी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांच्या आई सुनंदा कदम यांनी त्यांची सून, तिचा भाऊ, मामासह चौघांविरोधात मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार विश्रामबाग पोलिसांत केली. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सून स्नेहल सुशील कदम, तिचा भाऊ सागर भानुदास निकम, मामा चंद्रकांत भोईटे, संतोष भोईटे यांच्यावर गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी कदम यांचा मुलगा सुशील याला त्याची पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी १३ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत मानसिक आणि शारीरिक छळ केला. या छळातून त्याने सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली आहे. कदम यांच्या फिर्यादीनुसार या चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.