‘या’ योजनेचा लाभ घ्या, दररोज 500 रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? पात्रता काय?
Marathi May 11, 2025 09:25 PM

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे: भारत सरकार देशातील लोकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. देशातील विविध भागात राहणाऱ्या लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. देशात असे अनेक लोक आहेत की, जे त्यांच्या पारंपारिक व्यवसायांवर अवलंबून आहेत. अशा लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना सुरु केली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना असं या योजनेचं नाव आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही भारत सरकारने 2023 मध्ये सुरु केली होती. या योजनेअंतर्गत, भारत सरकार पारंपारिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांना केवळ आर्थिक मदतच देत नाही. पण ते त्यांना हमीशिवाय कर्ज देखील देते. जाणून घेऊयात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत काय मिळतो लाभ?

भारत सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत, 18 पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ दिले जातात. ही एक कौशल्य सन्मान योजना आहे. म्हणजेच, या योजनेत सामील झाल्यानंतर, लाभार्थ्यांना सरकारकडून कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 15000 रुपये देखील दिले जातात.

प्रशिक्षण काळात दररोज 500 रुपये मिळतात

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान, सरकारकडून दररोज 500 रुपये स्टायपेंड देखील दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सरकार लाभार्थ्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देखील देते.

कोणाला मिळतो या योजनेचा फायदा?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत, बोटी बांधणारे, गवंडी, कपडे धुणारे, बंदूकधारी, दगड कोरणारे, सोनार आणि हार बनवणारे यांना रोजगार दिला जातो. जे पुतळे बनवतात, जे केस कापतात, जे बाहुल्या आणि खेळणी बनवतात, जे बूट बनवतात, जे लोखंडावर काम करतात, जे हातोडा आणि टूलकिट बनवतात, जे मासेमारीचे जाळे बनवतात, जे कुलूप बनवतात, जे कपडे शिवतात, जे टोपल्या आणि झाडू बनवतात. या लोकांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा फायदा मिळतो.

कसा कराल अर्ज?

जर तुम्हालाही पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभांसाठी अर्ज करायचा असेल. तर त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या अधिकृत पोर्टल www.pmvishwakarma.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. दरम्यान, पात्र असणाऱ्या लाभार्थ्यानी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

PM Kisan Yojana : कधी जमा होणार PM किसानचा 20 वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार नाहीत

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.