Pakistan Most Wanted Terrorist : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांना दिवसाच तारे दाखवले. भारतीय लष्कराने रावळपिंडी, लाहोर, कराची पर्यंत ताकद दाखवून दिली. ऑपरेशन सिंदूर ने पाकिस्तानातील मोस्ट वॉटेंड दहशतवादी दहशतीखाली आहेत. त्यांना मृत्यू जवळ दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरची धास्ती त्यांना वाटत आहेत. पाक लष्कर आणि गुप्तहेर संघटनांच्या आश्रयाला ते गेले आहेत. कोण आहेत ते दहशतवादी, ज्यांचा पाठलाग आता होणार आहे.
ऑपरेशन सिंदूरची धास्ती
22 एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार केला. त्यात 26 जणांचा मृत्यू ओढावला. या हल्ल्याचा भारत बदला घेणार हे निश्चित होते. 7 मे रोजी भारतीय लष्कराने रात्री लाहोरपर्यंत धडक देत 9 दहशतवादी तळ नष्ट केले. प्रत्युत्तरात पाकिस्ताने ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. पण ते भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने हवतेच नष्ट केले. भारतीय हद्दीत काही ठिकाणी जीवितहानी झाली. अनेक ठिकाणी घरांचे, शाळांचे नुकसान झाले. तर भारतीय कारवाईत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक विमानतळावरील धावपट्ट्या उद्ध्वस्त झाल्या.
दहशतवाद्यांना अशी कारवाई अपेक्षित नव्हती. पण भारताने थेट पाकिस्तानात घुसत दहशतवाद्यांना नरकात पाठवले. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्यात लष्कर-ए-तैयब्बा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन दहशतवादी संघटनांचे टॉप कमांडर मारल्या गेले.
ते तीन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी
तर भारतात दहशतवादी कारवायात तीन टॉप मोस्ट दहशतवादी कारणीभूत आहे. ते पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची फॅक्टरी चालवतात. येथे पाकिस्तानातील मुलांना दहशतवादाचे प्रशिक्षणासोबतच शस्त्र चालवणे आणि हल्ला करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. पाकिस्तान लष्कराच्या मदतीने हे ट्रेनिंग देण्यात येते. हे तीन दहशतवादी टिपले तर दहशतवादाचे कंबरडे मोडेल.
हाफिज सईद : हा पाकिस्तानी लष्कर आणि सरकारच्या गळ्यातील ताईत आहे. लष्कर-ए-तैयब्बा या संघटनेचा तो प्रमुख आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्याला पण जबरदस्त फटका बसला. सध्या तो लष्कराच्या छावणीत लपून बसल्याचा दावा करण्यात येत आहे. भारताविरोधात तो सतत गरळ ओकत असतो.
मसूद अझहर : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक. बहावलपूर हे त्याचे गाव आहे. त्याने कराची येथील देवबंदी मदरसामधून धार्मिक कट्टरतावादाचे शिक्षण घेतले. 1994 साली भारताने त्याला अटक केली होती. 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्सचे अपहरण करून दहशतवाद्यांनी त्याची सुटका केली होती. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यात मसूद अझहरचा हात आहे.
सईद सल्लाहुद्दीन : या दहशतवाद्याचे खरे नाव मोहम्मद युसूफ शाह असे आहे. तो काश्मीरी दहशतवादी आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा तो प्रमुख आहे. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ले याने घडवून आणले आहे. तो संयुक्त जिहाद परिषदेचा अध्यक्ष पण आहे. काश्मीरमधील बडगामजवळील सोईबुग हे त्याचे मुळ गाव आहे. 2021 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने NIA ने त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.