Test Cricket : विराट की रोहित? टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार कोण?
GH News May 13, 2025 05:07 PM

भारतीय कसोटी संघात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आर अश्विन याने निवृत्ती घेतली. त्यानंतर नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी काही तासांच्या अंतराने टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. यासह टेस्ट क्रिकेटमधील रोहित-विराट युगाचा अंत झाला. अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतर रोहित आणि विराट या जोडीवर क्रिकेट चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं. मात्र आता रोहित आणि विराटने कसोटीतून निवृ्त्ती घेतल्याने चाहत्यांना त्या दोघांची उणीव भासणार आहे. या निवृत्ती निमित्ताने दोघांची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी कशी राहिलीय? हे जाणून घेऊयात.

विराट कोहलीची आकडेवारी

महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने 2014 साली कसोटी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. तेव्हापासून विराट युगाला सुरुवात झाली. विराटने आपल्या नेतृत्वात अनेक खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. विराटने संघाची मोट बांधली. विराटने आक्रमक कर्णधार अशी स्वत:ची प्रतिमा तयार केली. विराटने सौरव गांगुली याच्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना लढायला, भिडायला आणि अरे ला का रे करायलं शिकवलं.

विराट सर्वात यशस्वी कर्णधार

विराटने भारतीय संघांचं एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. विराटने त्यापैकी 40 सामन्यांमध्ये भारताला विजयी केलं. तर 17 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने बरोबरीत सुटले. विराट टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला.

5 हजार पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार

विराट कसोटीत सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. विराटने कसोटी कर्णधार म्हणून 5 हजार 864 धावा केल्या आहेत. तसेच विराटने या दरम्यान 20 शतकं आणि 18 अर्धशतकं लगावली. विराट कसोटीत 5 हजार धावा करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.

रोहित पर्वाची सुरुवात

विराट कोहली याने जवळपास 8 वर्ष भारताचं नेतृत्व केल्यानंतर 15 जानेवारी 2022 रोजी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विराटनंतर रोहित शर्मा याला कर्णधार करण्यात आलं. रोहितने जेमतेम 2 वर्ष कॅप्टन्सी केली. रोहितने या दरम्यान 24 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. रोहितला 24 पैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात यश आलं. तर टीम इंडियाला 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. रोहितच्या कॅप्टन्सीत 3 सामना अनिर्णित राहिले. रोहितने कर्णधार म्हणून 24 सामन्यांत 4 शतकांसह 1 हजार 254 धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.