Akola Accident : तेल्हारा येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
esakal May 13, 2025 09:45 PM

चिखली : चिखलीहून तेल्हारा येथे आपल्या दुचाकीवरून घरी परतणाऱ्या शंकर भोपळे (वय ४०), रा. तेल्हारा पेठ यांचा सोमठाणा फाटा, चिखली-खामगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सोमवार आज १२ मे दुपारी १ सुमारास घडला.

शंकर भोपळे हे आपल्या दुचाकीवरून चिखलीहून आपल्या गावी तेल्हारा जात होते. दरम्यान, सोमठाणा फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या म्हणून एमएच ०८ एस ८७८६ क्रमांकाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे भोपळे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत केली मात्र तोपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृताच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.