Bollywood News : अभिनेत्री अनुष्का शर्माच्या कमबॅकसाठी सगळेचजण उत्सुक आहेत. छकडा एक्सप्रेस या सिनेमातून अनुष्का कमबॅक करणार असल्याच्या चर्चा होत्या. भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांचा हा बायोपिक आहे. हा सिनेमा आता लांबणीवर पडणार असल्याच्या चर्चा आहे.
हा सिनेमा ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज होणार होता. पण नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं म्हटलं होतं. पण नंतर हा सिनेमा लांबणीवर पडला. दोन वर्षं होत आली तरीही या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाहीये. त्यातच क्रिकेटर झुलन गोस्वामीने यावर भाष्य केलं आहे.
हिंदुस्थान टाईम्सला दिलेली मुलाखतीत माजी क्रिकेटर झुलन गोस्वामी यांनी या सिनेमाबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं. ती म्हणाली,"मला याबद्दल काहीच माहिती नाही आणि सगळेजण मलाच विचारत आहेत. मला याबद्दल काहीच बोलायचं नाहीये." त्यामुळे आता सिनेमाचे निर्माते यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
या सिनेमाची निर्मिती क्लीन स्लेट फिल्म्स यांनी केली होती. हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार, हा सिनेमा जवळपास पूर्ण झाला होता. काही व्हीएफएक्स शॉर्ट चित्रित करणं बाकी होतं पण त्यापूर्वीच या सिनेमाचं काम बंद झालं.
नेटफ्लिक्स आणि क्लीन स्लेटमधील मतभेद वाढले आणि त्यांनी या सिनेमाची जबाबदारी सोडल्यामुळे आता या सिनेमाचं भविष्य अधांतरी आहे. तांत्रिक मतभेद आणि वाढतं बजेट यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे.
या सिनेमाबद्दल दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांनी अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाहीये. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रोसित रॉय आणि लेखन अभिषेक बॅनर्जी यांनी केलं आहे. या सिनेमासाठी अनुष्काने सात महिने बॉलिंगचं ट्रेनिंग घेतलं होतं. आता अनुष्काही बॉलीवूडला रामराम करणार असल्याच्या चर्चाना यामुळे जोर धरला आहे.