काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही, असं म्हणत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानसह अमेरिकेला सुनावलं आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीने सोडवले अशी आमची दीर्घकाळापासूनची राष्ट्रीय भूमिका असल्याचही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे या धोरणात आताही कोणताही बदल झालेला नसून उलट पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग रिकामी करावा हा प्रलंबित मुद्दा आहे, असंही जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
Operation Sindoor : मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकजगभरात गाजलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी सीसीएसची बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.