पस्तिशीनंतरचे आरोग्य
esakal May 15, 2025 08:45 AM

- सायली शिंदे, योगतज्ज्ञ

पस्तिशीचा टप्पा पार केल्यावर स्त्रियांच्या शरीरात अनेक जैविक व मानसिक बदल घडू लागतात. कुटुंब, करिअर, जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःकडे लक्ष द्यायला त्या विसरतात; पण याच काळात स्त्रियांच्या आरोग्याचा पाया डळमळू लागतो. म्हणूनच स्वतःकडे बघणे हा ‘स्वार्थ’ नसून ‘स्वसंवर्धन’ आहे.

वय वाढलं की आजार का वाढतात?

  • हार्मोन्समध्ये बदल : पीसीओडी, थायरॉइड, मेनॉपॉजपूर्व लक्षणं

  • हाडं कमजोर होणं : कॅल्शिअम/ व्हिटॅमिन डी कमी होणं

  • मानसिक थकवा : चिंता, झोपेच्या तक्रारी, चिडचिड

  • पचनतंत्र बिघडणं : आयबीएस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता

योगासनांमधून मिळणारा आधार

  • भुजंगासन : पाठदुखी कमी करते, हार्मोनल बॅलन्स राखते.

  • पवनमुक्तासन : पचनतंत्र सुधारते.

  • सुप्त बद्धकोनासन : गर्भाशयाचे आरोग्य सुधारतो, मानसिक शांती मिळते.

  • वज्रासन : जेवणानंतर ५-१० मिनिटं केल्याने पचनतंत्र बळकट.

  • अर्ध मत्स्येन्द्रासन : कंबर, यकृत, आणि मधुमेहावर उपयुक्त

योगासनांसाठी सूचना

  • पोट साफ असलेले असावे

  • शांत जागा निवडा

  • दीर्घ श्वासोच्छ्वासासह आसने करा

  • आसनानंतर दहा मिनिटे शांत बसून प्राणायाम

आहार : शरीरासाठी औषध

  • सकाळी : गरम पाणी + ओव्याचा काढा / भिजवलेले बदाम

  • दुपारी : ताजे, चविष्ट; पण घरचे अन्न - भरपूर भाज्या, तुपात पराठा, ताक

  • सायंकाळी : ताजी फळे किंवा सूप

  • रात्री : हलका आहार - मूगडाळ खिचडी, भाज्यांसोबत रोटी

  • हे टाळा : साखर, पॅकेज्ड फूड्स, मैदा, थंड पाणी

मानसिक आरोग्याचे बळ

  • ध्यान आणि श्वासोच्छ्वास सराव : दररोज १०-१५ मिनिटे ‘अनुलोम-विलोम’, ‘ब्राह्मी प्राणायाम’

  • स्वत:साठी वेळ देणे : आठवड्यातून १ दिवस ‘नो रिस्पॉन्सिबिलिटी डे’

  • बोलणे : विश्वासू व्यक्तीशी संवाद साधणे (भावनिक वजन हलके होते.)

  • सर्जनशीलतेला वाव : लेखन, चित्रकला, नृत्य, बागकाम

महिलांनी स्वतःचा विचार करणे म्हणजे ‘स्वतःचा आदर करणे’. आरोग्य हा तुमचा हक्क आहे. योग, आहार आणि सकारात्मकता हे तुमचे संरक्षण कवच आहे. तुमचे आरोग्य बिघडले, तर तुमच्यावर अवलंबून असलेली प्रत्येक गोष्ट ढासळते. आजपासून सुरुवात करा - स्वतःकडे बघा... प्रेमाने, काळजीने!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.