राज्यातील सर्व मंदिरात सीसीटीव्ही बसवा, प्रत्येक गावात धर्म दल स्थापन करा: गोपीचंद पडळकर
Marathi May 15, 2025 12:25 PM

नशिकमधील गोपीचंद पडलकर भाषण: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये देवी-देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हे सगळे नियोजनबद्धपणे सुरु आहे. सरकारला माझी विनंती आहे की, राज्यातील सगळ्या मंदिरांमध्ये (Temples) सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावेत. तसेच प्रत्येक गावात धर्म दल स्थापन करण्याची गरज आहे, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले. ते बुधवारी नाशिकच्या सिडको परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भाषण केले.

शाळा कॉलेजमध्ये मुली काय करतात  याकडे लक्ष द्या. हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन असे सध्या चालू आहे. मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत. त्यांच्यात लग्न करत नाही आणि आमच्या मुली बाटवत आहेत. काश्मिरची परिस्थिती काय? आज पर्यटक तिथे जात आहे त्यांना धर्म विचारुन गोळ्या घातल्या जातात. भारतातील तथाकथित सेक्युलर यांनी गोळ्या घालणाऱ्यांना धर्म विचारला पाहिजे. हा मोदींचा भारत आहे, पाकिस्तानात  घुसून दहशतवाद्यांना ठोकले. औरंगजब कबरीचा विषय आला की महत्वाचा नाही, असे म्हणतात. आता आर्थिक कोंडी कारवाई लागेल ज्याच्यावर डोक्यावर टिळा त्याच्याकडे खरेदी करा. हलाल काय आहे त्याचा सगळा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरु आहे. लव्ह जिहाद सुरु आहे, या सगळ्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. तुम्ही हे सगळं घरापर्यंत येण्याची वाट का पाहता? लँड जिहाद  किती झाले मोकळी जागा बघितली की बांधा मशीद. त्यांच्याकडे मिलिटरी आणि रेल्वे पेक्षा यांच्याकडे जास्त जागा आहे. हे वक्फ बोर्ड आले कुठून औरंगायच्या कळत नव्हते. भारत स्वतंत्र होईपर्यंत नव्हते. कायदा लागू करण्याची का वेळ आली?  राम मंदिर बांधल्यापासून सरकाराला महसूल मिळाला. 130 मोक्याच्या जागा सरकारे लोकसभा लागण्या अगोदर देऊन टाकल्या, इंग्रजांनी घेतलेल्या जागा देऊन टाकल्या, ही सरकारची मालमत्ता दिली. विश्व हिंदू परिषदेने यावर आवाज उठवला होता, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

Gopichand Padalkar News: जिहादी महाराजांना बदनाम करत आहेत, बीडीला संभाजी नाव दिले: गोपीचंद पडळकर

आज पाकिस्तानात फटाकड्या वाजत आहेत, धूर चीनमध्ये निघत आहे. छत्रपती संभाजी महाराज हा वाघाचा बछडा होता. संभाजी महाराजांनी डरकाळी फोडली तर मोघलांचा थरकाप उडायचा. संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याविषयी चुकीचे लिहण्यात आले. संभाजी महाराज शूर योद्धे होते, कुशल रणनीतीकार होते. शंभू महाराज आपल्या हिंदुस्थानाच्या समोरच एक आदर्श आहेत. धर्माच संरक्षण कसं करावं हे त्यांनी शिकवलं. एक खासदार झाला जो नाटक करत करत मोठा झाला. त्याने छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना सेक्युलर करण्यासाठी त्याच्या आयुष्यातील अनेक वर्षे घालवली. संभाजी महाराज हे एक लाख टक्के  धर्मवीर होते. संभाजी महाराजांच्या इतिहासात तोडफोड  होत आहे. जिहादी संभाजी महाराजांना बदनाम करत आहेत. संभाजी महाराजांचं नाव बीडीला देण्यात आलं, याकडे गोपीचंद पडळकर यांनी लक्ष वेधले.

Lawrence Bishnoi: गोपीचंद पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचे बॅनर्स

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील हिंदू विराट सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकताना दिसून आले. नाशिकच्या सिडको परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले फलक का झळकावण्यात आले, याविषयी चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा

'हिंदु सिंहाने काही दिवस अतिथी संपवाल, आपण तुम्हाला संपवाल, सिंदूर उरणार नाही …'; नवनीत रानानाने पाकिस्तानमधुनला धमकी दिली

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.