चीनच्या प्रसारमाध्यमांच्या सोशल मीडिया हँडल्सवर कारवाई
किस्तानला मदत करणाऱ्या देशांच्या विरोधात भारताने कारवाई सुरु केली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआ न्यूजच्या सोशल मीडिया अकौंटसनंर आता टीआरटी वर्ल्डच्या एक्स अकैंटवरही बंदी घालण्यात आली आहे. टीआरटी वर्ल्ड हे तुर्कियेचे ब्रॉडकास्टर असून त्याद्वारे ऑपरेशन सिंदूरनंतर सातत्याने भारताच्या विरोधात दुष्प्रचार केला जात होता. तुर्किये आणि चीनची प्रसारमाध्यमाने सातत्याने भारताच्या विरोधात खोट्या बातम्या आणि भ्रामक माहिती फैलाविली. याचमुळे भारत सरकारने त्यांच्या सोशल मीडिया अकौंट्सवर बंदी घालण्याचे पाऊल उचलले आहे.
भारतात यापूर्वीच पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कियेवर बहिष्कार टाकण्याची मोहीम जोर पकडू लागली आहे. भारताच्या लोकांनी तुर्किये आणि अझरबैजान येथे पर्यटनासाठी जाण्याचा विचार त्यागला आहे. अनेक पर्यटन कंपन्यांनी देखील देशहिताच्या भावनेला विचारात घेत तुर्किये आणि अझरबैजानचे बुकिंग रद्द केले आहे.
तुर्किये विरोधात भारतीयांमध्ये संताप
ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ईजमायट्रिपने मार्गदर्शक सूचना जारी करत तुर्किये आणि अझरबैजानचा प्रवास अत्यंत आवश्यक असेल तरच करावा असे सुचविले आहे. पहलगाम हल्ला आणि भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पर्यटकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तुर्किये आणि अझरबैजानने पाकिस्तानला समर्थन दिले असल्याने या देशांमध्ये अत्यंत आवश्यक असेल तरच जाण्याचा निर्णय घ्यावा असे प्लॅटफॉर्मचे संस्थापक निशांत पट्टी यांनी म्हटले आहे. याचबरोबर इक्सिगोने तुर्किये, चीन आणि अझरबैजानसाठी सर्व फ्लाइट्स आणि हॉटेल बुकिंग स्थगित केले आहे. सध्या सर्व भारतीयांच्या भावनांचा सन्मान करत आम्ही तुर्किये, अझरबैजान आणि चीनच्या सर्व फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगला रोखले आहे. आमची प्रतिबद्धता जबाबदारीने आणि स्वत:च्या देशाच्या व्यापक हितांसोबत ताळमेळ राखत काम करण्याची आहे. तसेच भारतीय प्रवाशांना विश्वास, सुरक्षा आणि हितांना प्राथमिकता देणे असल्याचे उद्गार इक्सिगोचे सीईओ आलोक वाजपेयी यांनी काढले आहेत.