भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अखेर आठवड्याभरानंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या 18 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. दोन्ही देशातील तणावाच्या स्थितीनंतर 9 मे रोजी आयपीएल 2025 स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता 17 मे पासून क्रिकेटचा थरार रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी व्हाईट बॉल क्रिकेटसाठी संघ जाहीर केला आहे.
आयपीएल 2025 दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड यांच्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज या दोन्ही मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. उभयसंघात दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. आयर्लंडने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अनुभवी पॉल स्टर्लिंग दोन्ही मालिकेत आयर्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर लोरकन टकर याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी 3 अनकॅप्ड खेळाडूंना संधी दिली आहे. या तिघांमध्ये कॅड कारमायकल, टॉम मेयस आणि लियाम मॅकार्थी यांचा समावेश आहे. मॅकार्थीला दोन्ही मालिकांसाठी संधी देण्यात आली आहे.
दरम्यान वेस्ट इंडिज क्रिकेट टीम आयर्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. विंडीज इंग्लंड दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर विंडीज पुन्हा आयर्लंड दौऱ्यात टी 20 मालिका खेळणार आहे.
पहिला सामना, 21 मे, द व्हीलेज, डब्लिन
दुसरा सामना, 23 मे, द व्हीलेज, डब्लिन
तिसरा आणि अंतिम सामना 25 मे, द व्हीलेज, डब्लिन
वनडे सीरिजसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, कॅड कारमायकल, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रीज, जोश लिटिल, टॉम मेयस, एंड्रयू मॅकब्रायन, बॅरी मॅकार्थी, लियाम मॅकार्थी, हैरी टेक्टर, लोरकन टकर आणि क्रेग यंग.
पहिला सामना, 12 जून
दुसरा सामना, 14 जून
तिसरा सामना 15 जून
टी 20i सीरिजसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फ्रीज, जोश लिटिल, बॅरी मॅकार्थी, लियाम मॅकार्थी, हॅरी टेक्टर, लोरकन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.