swt1518.jpg
63990
बांदाः येथे स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आलेले मडुरा हायस्कूलचे माजी विद्यार्थी.
माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान
वाय. जे. देसाई ः मडुरा हायस्कूलमध्ये २००१-२००२ बॅचचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः या बॅचचा स्नेहमेळावा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यावेळी हायस्कूलचा निकाल पहिल्यांदाच ६४ टक्के लागला होता. माजी विद्यार्थिनी पूर्णिमा गावडे-मोरजकर हिने ‘गजाल गाथण’ हे मालवणी पुस्तक प्रकाशित करून शाळेचे नाव सातासमुद्रपार नेले, ही बाब अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन मडुरा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक वाय. जे. देसाई यांनी केले.
मडुरा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या २००१-२००२ या बॅचचे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने २३ वर्षांनी एकत्र आले. बांदा येथील हाय व्हॅली जंगल रिसॉर्टमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. सूत्रसंचालन सारिका केणी, पूर्णिमा गावडे यांनी केले. यावेळी सहशिक्षक जी. के. गावडे, चंद्रशेखर नाडकर्णी, लक्ष्मण पावसकर, सूर्यकांत सांगेलकर, शिक्षिका एस. पी. कांबळे, अमिता स्वार आदी उपस्थित होते. शिक्षक जी. के. गावडे यांनी, आपल्यातील दत्ताराम गावडे हा विद्यार्थी आज देशरक्षणासाठी स्नेहमेळावा बाजूला ठेवून सीमेवर लढण्यासाठी गेला असून, हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार काढले. श्रीमती स्वार यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. श्री. पावसकर यांनी आरोग्याविषयी महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. श्रीमती कांबळे, श्री. सांगेलकर यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. कास गावाचे सरपंच म्हणून निवडून आलेले माजी विद्यार्थी प्रवीण पंडित यांचा सत्कार मुख्याध्यापक देसाई यांनी केला. बांदा नट वाचनालयाचा मालवणी साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत पूर्णिमा गावडे यांना सन्मानित करण्यात आले.
गुरुदास गवंडे यांनी आभार मानले. माजी विद्यार्थी पूर्णिमा गावडे, गुरुदास गवंडे, सारिका केणी, प्रवीण पंडित, जयमाला गवस, रमेश मळगावकर, भक्ती परब, राजन धुरी, वामन गावडे, कल्याणी नाईक, पिंटो परब, रुपाली पंडित, सुषमा मेस्त्री, कल्पेश मोरजकर, जॉन गुडीनो, उमेश निगुडकर, रमाकांत भाईप, साईनाथ तुळसकर, रमेश कुडके, वैशाली पेडणेकर, अर्चना कासकर, प्रवीण मांजरेकर, सुनील गाड, प्रमिशा पंडित, शंकर करमळकर, योगेश राणे, रोहन रुबजी, रेश्मा जाधव, शुभांगी परब, सुदीप गावडे, हिरू जाधव, शिवाजी देसाई, समीर निगुडकर, शिल्पा वेंगुर्लेकर, प्रियांका वेंगुर्लेकर, नितीन धुरी, सुजाता साळगावकर, अमोल पंडित, रेवती गवंडे, संध्या महाले, मिलिंडा रोड्रिक्स, मिलन परब, नारायण नाईक, रामा धुरी, दीपक परब, गणेश सातार्डेकर, सुदीप गावडे, दत्ताराम मेस्त्री, वर्षा धुरी, शांती गावडे, जोशना पंडित, रंजना राणे, समृद्धी पावसकर, प्रिया धुरी, सुरेखा गावडे, विठ्ठल सावंत आदी उपस्थित होते.