‘संजयजी बोलीये…’ ईडीने मित्रांच्या घरी धाड टाकताच संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; नेमकं काय स
Marathi May 17, 2025 11:25 AM

संजय राऊत पुस्तक नरकटला स्वर्ग: मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बहुचर्चित  ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचं (Narkatla Swarg) आज प्रकाशन आहे. आज सायंकाळी 6 वाजता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये तिथे होणार. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. पत्राचाळ प्रकरणात ईडी चौकशीनंतर संजय राऊत यांनी आर्थर रोड कारागृहात शंभर दिवस तुरुंगवास भोगला. यावेळी कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. संजय राऊतांनी तुरुंगातील अनुभव यामध्ये मांडले आहेत. अनेक राजकीय दृष्ट्या खळबळजनक दावे या पुस्तकात पाहायला मिळताय. शिवाय काही गौप्यस्फोटसुद्धा या पुस्तकात करण्यात आले आहेत. एबीपी माझाच्या हाती नरकातला स्वर्ग या पुस्तकाची प्रत आहे.

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातील काही महत्त्वाचे खुलासे समोर आले होते. यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी संकटकाळी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना संकटकाळी कशाप्रकारे मदत केली याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आता पुस्तकातील नवीन खळबळजनक खुलासा समोर आला आहे. आपल्यावरील कारवाईबाबत ईडी अधिकाऱ्यांवर वरून कोणाचा तरी दबाव होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. ईडी अधिकाऱ्याने वरती बोलून घेण्याचा सल्लाही संजय राऊतांना दिला होता, असं राऊत आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात म्हणतात. मात्र आपल्या वरती केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत असं राऊत यांनी त्या अधिकाऱ्याला सुनावलं असं त्यांनी पुस्तकार नमूद केलंय.

छापे पडताच संजय राऊतांचा थेट अमित शाह यांना फोन-

पुस्तकात खासदार राऊतांनी अनेक दावे केले आहेत. आपल्याला ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता असा दावा संजय राऊत यांनी केलाय.  फेब्रुवारी 2022 मध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीचे छापे पडले. दिवसभर हे छापे सुरू राहिले. या छाप्यांनंतर खासदार संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री शाह यांना फोन लावला आणि हवं तर थेट आपल्याला अटक करा, पण निकटवर्तियांना, कुटुंबाला का त्रास देता असा सवाल केला. संजय राऊत आणि अमित शहा यांच्या फोनवरील संवादात नेमकं काय घडलं? संजय राऊत यांच्या अडचणी कशा वाढल्या? हे या पुस्तकातून राऊत यांनी मांडला आहे.

https://www.youtube.com/watch?v=Sfjjroloe-g

संबंधित बातमी:

Sanjay Raut Book Narkatla Swarg: अमित शाह घामाघूम, लहान जय शाहांना घेऊन मातोश्रीवर; बाळासाहेबांना म्हणाले, ‘आप बात करेंगे तो न्यायमूर्ती…’

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.