IPL 2025 पुन्हा सुरु होण्याआधी, पाहा कोणता संघ पोहोचणार अंतिम 4 मध्ये
Marathi May 17, 2025 10:24 PM

ऑपरेशन सिंदूरनंतर आयपीएल 2025 उर्वरित स्पर्धेला प्रारंभ होत आहे. आज शनिवार (17 मे) रोजी आयपीएल स्पर्धेतील 58वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. या सामन्यात केकेआर संघ प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच आरसीबी हा सामना जिंकून पॉईंट्स टेबलवर टॉपच्या स्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण याआधी जाणून घ्या की पॉईंट्स टेबलमध्ये कोणता संघ सध्या कुठे आहे.

अठराव्या हंगामात आतापर्यंत 7 संघ प्लेऑफच्या रेस मध्ये आहेत. जर आजच्या सामना पावसामुळे सामना रद्द झाला तर केकेआर प्लेऑफच्या रेस मधून बाहेर होईल. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान, चेन्नई हे संघ आधीच प्लेऑफच्या रेस मधून बाहेर झाले आहेत.

आरसीबी आणि गुजरात प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या दोन्ही संघांनी 14 मधील 11 सामने खेळले आहेत ज्यामध्ये 8 सामने जिंकून गुजरात आणि बंगळुरुने 16-16 गुण मिळवले आहेत. गुजरात संघाचा नेट रन रेट बंगळूरपेक्षा चांगला आहे. त्यामुळे ते टॉपच्या स्थानावर आहेत. आज 17 मे रोजी आरसीबी जिंकली तर पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर येईल.

आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफसाठी 5 संघात मोठी टक्कर पाहायला मिळत आहे. पंजाब पॉईंट्स टेबलमध्ये 15 गुणांनी तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांचे अजून 3 सामने बाकी आहेत. एक सामना जिंकल्यानंतर पंजाब प्लेऑफमध्ये क्वालिफाय करेल. तसेच मुंबईने 12 सामन्यात 7 सामने जिंकून 14 गुण मिळवले आहेत. मुंबई पॉईंट्स टेबलवर चौथ्या स्थानावर आहे. मुंबईला क्वालिफाय करण्यासाठी दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.

दिल्ली कॅपिटल्स 13 गुणांनी पाचव्या स्थानावर आहे. दिल्लीचे 3 सामने उरले आहेत. त्यातील 2 सामने जिंकून ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. तसेच केकेआर 11 गुणांनी सहाव्या स्थानावर तसेच लखनऊ संघाकडे 10 गुण आहेत, ते सातव्या स्थानावर आहेत. लखनऊचे 3 सामने उरले आहेत आणि केकेआरचे 2 या दोन्ही संघांना क्वालिफाय करण्यासाठी त्यांचे सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.