आयपीएलचा सुपर संडे, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं गणित सुटणार? दिल्लीला धाकधूक
GH News May 18, 2025 01:06 AM

आयपीएल 2025 स्पर्धेत 18 मे रोजी दोन सामने आहेत. पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आहे. तर दुसरा सामना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. हे दोन्ही सामने प्लेऑफचं गणित सोडवणारं किंवा बिघडवणारं आहे. पहिला दुपारी 3.30 वाजता राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानात होणार आहे. खरं तर राजस्थान रॉयल्सचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पण पंजाब किंग्सला या स्पर्धेतील विजय थेट प्लेऑफचं तिकीट देणार आहे. त्यामुळे हा सामना पंजाब किंग्ससाठी खूपच महत्वाचा आहे. राजस्थान रॉयल्सला जय पराजयाने काहीच फरक पडणार नाही. पण स्पर्धेतील शेवटचे सामने जिंकून प्रतिष्ठा वाचवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात जबरदस्त लढा होईल. पंजाब किंग्सने हा सामना गमवला तर प्लेऑफचं गणित आणखी सामना दूर जाईल.

पंजाब किंग्सचं प्लेऑफचं गणित कसं?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. एक सामना पावसामुळे ड्रा झाला. त्यामुळे 15 गुणांसह पंजाब किंग्स गुणातलिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. जर त्यांनी उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकले तर ते 19 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे पंजाब किंग्सला राजस्थान विरुद्धचा सामना जिंकणं भाग आहे. नाही तर उर्वरित दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवण्याचा दबाव वाढेल.

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचं काय?

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. आता उर्वरित 3 पैकी एका सामन्यात विजय आवश्यक आहे. तर 18 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान पक्कं करेल. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं तर प्लेऑफचं तिकीट पक्कं होईल. पण दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. नाही तर प्लेऑफचं गणित किचकट होईल. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने 11 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे 12 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सला तीन पैकी तीन सामने जिंकावे लागतील. तर सरळ मार्गी प्लेऑफ गाठेल. पण या सामन्यात पराभव झाला तर मात्र गणित जर तर वर येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.