मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे 'भाग्यलक्ष्मी' या झी मराठीवरील मालिकेमधून घराघरात पोहोचली. तर 'शिलाच्या आयचा घो' या गाण्याने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. तिने आपली अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. मात्र तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील प्रचंड चर्चा झाली. त्याचं कारण म्हणजे तिचा लग्नाचा निर्णय. नेहाने २०२० मध्ये उद्योगपती शार्दूल सिंग बायस याच्याशी लग्न केलं. मात्र शार्दुलचं हे तिसरं लग्न होतं. त्यामुळे या लग्नही जोरदार चर्चा झाली. आता पुन्हा एकदा नेहा सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण तिने तिच्या सावत्र मुलींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
नेहा गेली बऱ्याच काळ मराठी मालिका क्षेत्रापासून दूर आहे. नेहा नुकतीच आपल्या कुटुंबासोबत परदेशात फिरायला गेली होती. ती तिच्या पतीसोबत बालीमध्ये फिरायला गेली होती. तिने तिथले काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहेत. कारण या फोटोंमध्ये तिने तिच्या सावत्र मुलींचे फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.या पोस्टमध्ये नेहा तिचे पती आणि दोन मुली परदेशात सुट्टयांचा आनंद घेताना दिसतायत.
नेहा आणि शार्दूल यांना स्वतःची मुलं नाहीयेत. मात्र शार्दूलला मागच्या २ लग्नांमधून २ मुली आहेत. त्याचं पहिलं लग्न उद्योजिका अनिता अगरवाल हिच्याशी झालं होतं. मात्र २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव रिया बायस. तर दुसऱ्या पत्नीपासून शार्दूलला दुसरी मुलगी आलिया बायस आहे. शार्दुलच्या दोन्ही मुली प्रसिद्धीपासून दूर राहतात. त्या आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फारशी शेअर करत नाहीत. मात्र नेहाने पहिल्यांदाच आपली सावत्र मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
मात्र याआधी कधीही नेहाने आपल्या सावत्र मुलींसोबत फोटो शेअर केले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. अचानक तिने हे फोटो का पोस्ट केले याबद्दल नेटकरी प्रश्न विचार आहेत. नेहाआता कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.