गुणवत्तापूर्ण फंड योजना
esakal May 19, 2025 11:45 AM

देवदत्त तांबे - म्युच्युअल फंड वितरक

आपण फोन किंवा कार खरेदी करताना उच्च गुणवत्तेला प्राधान्य देतो. कारण या गोष्टी नियमित वापरात किंवा आदर्श परिस्थितीतच नव्हे, तर कठीण परिस्थितीतही विश्वासार्ह असाव्यात, अशी आपली अपेक्षा असते. त्याचप्रमाणे, गुंतवणूक करताना, उच्च गुणवत्तेच्या व्यवसायांकडून चांगल्या काळात स्थिर परतावा मिळण्याची; तसेच बाजारातील तणावाच्या काळातही चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असते. यासाठी कमी अस्थिरता, उच्च आणि जोखीम समायोजित परतावा असलेली गुणवत्तापूर्ण व्यवसायक्षेत्रे ओळखणे महत्त्वाचे असते. साधारणपणे उत्पादन, सेवा, वितरण किंवा ब्रँड क्षेत्रातील उत्कृष्टता; तसेच भांडवलावरील उच्च परतावा देणारे, रोख राखीव निधीचे उच्च प्रमाण आणि चांगले भांडवल वाटप असलेले व्यवसाय उच्च गुणवत्तापूर्ण असतात.

अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे एक उत्तम मार्ग ठरतो. मार्च २०२५ पर्यंत, पाच वर्षांच्या दैनंदिन रोलिंग रिटर्न्सच्या आधारावर, ‘निफ्टी २०० क्वालिटी ३० टोटल रिटर्न इंडेक्स’ने कोणत्याही नकारात्मक परताव्याच्या कालावधीशिवाय ‘निफ्टी २०० टोटल रिटर्न इंडेक्स’ने दर्शविलेल्या व्यापक बाजारापेक्षा उच्च सरासरी परतावा दिला आहे. वर्ष २०१०-११, २०१५-२०१६, २०१९-२०२० आणि २०२१-२०२२ च्या मंदीच्या बाजारात, ‘निफ्टी २०० क्वालिटी ३० टोटल रिटर्न इंडेक्स’ने व्यापक बाजारापेक्षा आणि व्हॅल्यू, मोमेंटम आणि अल्फा थीमपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. या इंडेक्सचा आधार घेऊन गुंतवणूक करणाऱ्या क्वालिटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची संधी सध्या गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल क्वालिटी फंड

उच्च-गुणवत्तेच्या व्यवसायांनी दिलेले सातत्य, टिकाऊपणा आणि लवचिकता याचा लाभ घेण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंडाचा विचार केला जाऊ शकतो. या श्रेणीतील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल क्वालिटी फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी योजना आहे. ही नवी फंड योजना (एनएफओ) २० मे २०२५पर्यंत खुली आहे. ही योजना गुणवत्ता घटकांवर केंद्रित असून, ती गुंतवणूकदारांना आकर्षक, वाजवी मूल्यांकनावर उपलब्ध उच्च गुणवत्तेच्या शेअरसह पोर्टफोलिओ वाढवण्याची संधी देते. यातून दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीचा उद्देश साध्य करता येतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.