Joe Biden Cancer News: अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी कॅन्सर या गंभीर आजाराने घेरलं आहे. जो बायडन यांना प्रोटेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. जो बायडेन यांच्या शरीरात आजार मोठ्या प्रमाणात पसरला असल्याचं देखील समजत आहे. चिंताजनक बाब म्हणजे कॅन्सर त्यांच्या हाडांपर्यंत पसरला आहे. जो बायडेन यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली. ही बातमी त्यांच्या समर्थकांसाठी मोठा धक्का आहे.
जो बायडेन आता 82 वर्षांचे आहे. त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जो बायडेन यांनी लघवीची समस्या होता. त्यामुळे शुक्रवारी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. तेव्हा केलेल्या काही चाचण्यांनंतर जो बायडेन यांनी प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचे रिपोर्ट समोर आले. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर जो बायडेन यांचे कुटुंबिय उपचाराच्या विविध पर्यायांवर विचार करत आहेत. जो बायडेन यांचा आजार अधिक गंभीर असल्याचं देखील सांगितलं जातं आहे.
जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याच्या बातमीने डोनाल्ड ट्रम्प देखील दुःखी आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहे. ट्रम्प म्हणाले, ‘मी आणि मेलानिया… जो बायडेन यांचे मेडिकल रिपोर्ट ऐकल्यानंतर प्रचंड दुःख झालं आहे. जो बायडेन लवकर आणि पूर्णपणे बरे होतील अशी आशा करतो.’ असं ट्रम्प म्हणाले आहेत.
जो बायडेन यांना झालेला कर्करोग खूप धोकादायक आहे. प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणारा एक गंभीर आजार आहे. ते प्रोस्टेट ग्रंथीमध्ये सुरू होते. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि गुदाशयासमोर असते, जी वीर्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जो बायडेनचा आजार गंभीर आहे आणि तो आता हाडांमध्ये पसरला आहे.
प्रोस्टेट कर्करोग हळूहळू वाढू शकतो, परंतु काही प्रकरणांमध्ये तो आक्रमक होऊ शकतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये, जसे की हाडे किंवा लिम्फ नोड्समध्ये पसरू शकतो.
आजार डोकं वर काढतो तेव्हा काहीही कळत नाही. आजाराची लक्षणं लवकर दिसून येत नाही. पण आजार शारीरात फार लवकर पसरतो. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये मूत्र किंवा वीर्य मध्ये रक्त येणे, पाठीच्या खालच्या भागात, ओटीपोटात, छातीत किंवा इतर हाडांमध्ये वेदना होणे आणि इरेक्टाइल डिसफंक्शन यांचा समावेश आहे.
जर प्रोस्टेट ग्रंथी मोठी झाली आणि गुदद्वारावर दबाव आला तर काही पुरुषांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अचानक वजन कमी होणे आणि भूक न लागणे ही देखील त्याची लक्षणे असू शकतात.