Aishwarya-Abhishek : ऐश्वर्या-अभिषेक 'कजरा रे' गाण्यावर थिरकले , पाहा व्हायरल VIDEO
Saam TV May 19, 2025 03:45 PM

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan ) हे बॉलिवूडचे पावर कपल गेल्या काही काळापासून चांगलेच चर्चेत आहे. त्याच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र नंतर अनेक वेळा हा क्युट कपल एकत्र स्पॉट झाले. आता ऐश्वर्या-अभिषेकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्या आणि राहुल वैद्य गात असलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ राहुल वैद्यने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आणि अभिषेक बच्चन 'कजरा रे' (Kajra Re) गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. 'कजरा रे' हे गाणे 'बंटी और बबली' या चित्रपटातील आहे. चित्रपटात 'कजरा रे' गाण्यावर ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन डान्स केला आहे.

व्हिडीओमध्ये गाणे आणि ढोलच्या तालावर अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र नाचताना दिसत आहेत. तर लेक आराध्याही नाचत आहे. अभिषेक ऐश्वर्याकडे प्रेमाने पाहतना दिसत आहे. राहुल वैद्यने या डान्स व्हिडीओला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "सर्वात नम्र रॉकस्टार अभिषेक बच्चन... सर्वात आकर्षक आणि सुंदर ऐश्वर्या राय यांच्यासोबत 'कजरा रे' गाणं " या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. 2011 साली ऐश्वर्याने गोंडस आराध्याला जन्म दिला. हे कुटुंब कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चाहते ऐश्वर्या रायच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर अभिषेक बच्चन लवकरच 'हाऊसफुल 5' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हाऊसफुल 5'चित्रपट 6 जूनला रिलीज होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.