कुंडलिक पाटील
कुडित्रे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकांमध्ये यंदा जिल्ह्यामध्ये ४१५ उद्दिष्ट असताना ४३२ प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून योजना राबविण्यात जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्यात योजनेमुळे ३८०० कुशल, अर्ध कुशल कामगारांना रोजगाराची संधी निर्माण झाल्या आहेत; अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून देण्यात आली.
केंद्र शासनातर्फे सहायित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सहा वर्षांसाठी राबवली जात आहे. शेतमालावर प्रक्रिया करणारे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, गट, शेतकरी उत्पादक, गट कंपनी, संस्था, स्वयंसेवक यांची पत मर्यादा वाढविण्यासाठी असलेल्या उद्योगांना औपचारिक रचनेत आणून त्यांचा विस्तार करणे, ब्रॅण्डिंग, विपणन अशा घटकांवर काम केले जाते. असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे हा उद्देश योजनेचा आहे. शासनाचे खर्चाचे प्रमाण केंद्र शासनासाठी ६० टक्के, राज्य शासनाठी ४० टक्के आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगात वैयक्तिक घटकांमध्ये यावर्षी ४३२ लाभार्थ्यांना प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली होती. यामध्ये २६.५१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले होते. २०२०/२१ पासून ९९० प्रकल्प मंजूर आहेत. या लाभार्थ्यांना ४१.८० कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. यामध्ये प्रामुख्याने काजू प्रक्रिया, फळे, भाजी प्रक्रिया, बेकरी उत्पादने, अन्नप्रक्रिया, पशुखाद्य निर्मिती या प्रकल्पांचा समावेश आहे. योजनेमुळे ३८०० कुशल, अर्धकुशल कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाला आहे. वैयक्तिक प्रकल्पातून २६ कोटी रुपये प्राप्त मिळाले आहेत.
तालुकानिहाय उद्दिष्ट साध्य
करवीर ४८, कागल २८, राधानगरी ३३, गगनबावडा ४, शिरोळ ३८, शाहूवाडी ८, पन्हाळा ३६, हातकणंगले ४६, गडहिंग्लज ३६, चंदगड ४८, आजरा ७८, भुदरगड ३०.
नवउद्योजक, बेरोजगारी महिला, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी.
वैयक्तिक गट ः प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल १० लाख
पायाभूत सुविधेसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल ३ कोटी
बीजभांडवल प्रतिसदस्य ४० हजार, गटास ४ लाख
प्रशिक्षण व हाताळणीसाठी सहाय्य शंभर टक्के अनुदान
वैयक्तिक मंजुरीसाठी डीआरपीना प्रतिमंजूर प्रस्तावसाठी २० हजार मानधन
तृणधान्य ९०, गूळ उत्पादने १८, पशुखाद्य उत्पादने १०, सोयाबीन प्रक्रिया २, दुग्धजन्य पदार्थ २९, फळे व भाजीपाला प्रक्रिया १०, मसाले उत्पादने ३८, बेकरी प्रक्रिया ४८, तेलबिया ५, काजू १६७, अन्य उत्पादने ४.
योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. सर्व शेतमालावर प्रक्रिया करणारे इच्छुक लाभार्थ्यांना योजनेमध्ये सहभाग नोंदणी करावी.
- जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी