Maharashtra News Live Updates : कोंढव्यात भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडले
Saam TV May 19, 2025 04:45 PM
रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात खड्ड्यात गाढून घेत अंतरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरगाव येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी एकत्र येत रस्त्यामध्येच पाच फूट खड्डा खोदून त्यात स्वतःला कमरेपर्यंत मातीमध्ये गाढून घेत आंदोलन चालू केले आहे. बार्शी - पाथरूड या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून अंतरगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत होती.मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील मागील दोन वर्षापासून बार्शी पाथरूड अंतरगाव हद्दीतील रोड मंजूर असून अद्यापही त्याचे काम पूर्ण झाले नाही.त्यामुळे रस्ता खोदून अर्धे शरीर खड्ड्यामध्ये पुरून रोडवरच ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.खराब रोड मुळे शाळकरी विद्यार्थी होणारी त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केलीय.

मनमाडला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्टेशन लागले ठिकठिकाणी गळू

मनमाडला रात्री झालेल्या धुवांधार पावसामुळे रेल्वे स्टेशनच्या सर्वच प्लॉट फार्म वरील छताना मोठ्या प्रमाणात गळती लागली,ठिकठिकाणी छतातून इतकं पाणी गळत होते की प्रवाशांना उभे राहणे देखील कठीण झाले त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले.विशेष म्हणजे काही महिन्या पूर्वीच लाखो रुपये खर्च करून सर्व प्लॉट फॉर्मच्या छतावरील सिमेंटचे पत्रे काढून त्याजागी लोखंडी पत्रे बसविण्यात आले तरी देखील पाण्याची गळती सुरूच आहे त्यामुळे लाखो रुपये वाया गेले असून रेल्वे प्रशासना तर्फे प्रवाशांना सर्व सुविधा देण्यात येत असल्याचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून आलय

हवामान खात्याचा रायगडला इशारा

पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची वर्तवली शक्यता

21 मे पर्यंत यलो अलर्ट तर 22 मेला रेड अलर्ट

ताशी 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची भिती

Maharashtra News Live Updates : कोंढव्यात भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडले

कोंढवा बुद्रुक येथील भोलेनाथ चौका जवळ भरधाव इनोव्हा गाडीने एका लहान मुलाला चिरडले. अपघातात लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.

बुलढाण्यात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर अद्याप कायम आहे .. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात भाग बदलत.अवकाळी पाऊस पडत आहे .. सोबतच विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसान सुद्धा होत आहे .. काल सायंकाळी सुद्धा विजांच्या कडकडाटात तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.. साखरखेर्डां परिसरात ही मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील नाल्या वाहू लागल्या तर वीज पडल्याने शेतकऱ्यांचे चार जनावरे सुद्धा मरण पावली .. अनेक भागात उन्हाळी पिक अद्याप उभी असल्याने त्यांचे सुद्धा नुकसान झाले.

पुणे - मिरज - कोल्हापूर मार्गावर नवी डेमू सुरू

अखेर पुणे - मिरज - कोल्हापूर मार्गावर नवी डेमू ( डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ) रेल्वे गाडी धावू लागली आहे. दैनिक सकाळच्या बातमीमुळे वारंवार बंद पडणाऱ्या लाल डेमू पासून प्रवाशांची सुटका झाली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून वारंवार बंद पडणारी लाल डेमू हटवून त्याजागी नवी कोरी डेमू या मार्गावर दाखल झाली आहे. यात सुटसुटीत आसन व्यवस्थित सह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खंडणी मागणाऱ्या संशयिताला २ दिवसांची पोलिस कोठडी

* आरोपी राहुल भुसारे याने 1 कोटी रुपयांच्या खंडणीची केली होती मागणी

* भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्यासाठी विविध नंबरवर फोन व SMS पाठवले

* खंडणीची मागणी केल्याने गुन्हा शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अटक

* आरोपीकडून मोबाइल व SIM कार्ड जप्त, पुढील तपास सुरू

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल दीड हजार कोटीचे कर्ज थकीत

कर्जमाफीच्या चर्चेने अमरावती जिल्ह्यातील 1,29.447 शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून गतवर्षी घेतलेल्या कर्जाचा भरणा केला नाही

शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली नसल्याने बँका देखील अडचणीत

यावर्षी नियमीत खातेदारांना फक्त दीड महिन्यात 6936 शेतकऱ्यांना 513.10 कोटीचे कर्ज वाटप

मागील वर्षी बँकेकडून कर्ज घेतलेले कर्ज शेतकऱ्यांनी भरले नसल्याने अमरावती जिल्ह्यातील लाखो शेतकरी खरीप हंगामात बँके कडून कर्जापासून राहणार वंचित

थकीत कर्ज असल्याने शेतकऱ्यांना बँक देत नाही कर्ज

गांजा घेऊन येणाऱ्या दोघांना अटक...मालेगाव पोलिसांची कारवाई

वाशिमच्या मालेगाव पोलिसांना बुलडाणा जिल्ह्यातून दोन जण गांजा घेऊन येत असल्याच्या गुप्त माहितीवरून त्यांना ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांच्याजवळून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. २ किलो गांजा सह एक दुचाकी असा एकूण 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेख मोहसीन शेख युसुफ ,(वय २७ वर्षे) व अब्दुल फहीम अब्दुल कय्युम (वय ३७ वर्षे )दोघेही रा.मेहकर,जिल्हा बुलडाणा. अशी आरोपींची नावे आहेत. मालेगाव मेहकर मार्गावरील मुंगळा फाट्यावर ही कारवाई पार पडली.

मराठवाड्यात अवकाळी पावसाने दणादाण, वीज कोसळून ३ जण ठार

मराठवाड्यात अवकाळी पावसाने दणादण उडवली. वीज कोसळून ३ जण ठार; अकरा जनावरे दगावली तर उन्हाळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरी भागात अनेक घरात पाणी शिरले. अवकाळीने संभाजीनगर जिल्ह्याला जोरदार झोडपले. संभाजीनगरात विक्रमी ५९.४ मिलिमीटर पाऊस झाला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यानं आजही अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय. मात्र काल सायंकाळी या उन्हाळ्यातील सगळ्यात मोठा अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह झाला.

जत तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

जत तालुक्यातील पूर्व भागातील संख, गोंधळवाडी सह परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे.वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह हा अवकाळी पाऊस पडला आहे.वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोंधळेवाडी, गुड्डडापूर,असंगीतुर्क रस्त्यावरील सह परिसरातील रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली होती,तसेच अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेल्याचा प्रकार घडला आहे.तर वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.दरम्यान रस्त्यावरून पडलेली अनेक झाडे तुकाराम बाबा महाराज यांच्या माध्यमातून रात्रभर प्रयत्न करून हटवण्यात आली.

उल्हासनगर,अंबरनाथ मध्ये अवकाळी पावसाची हजेरी

पहाटे चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस...

अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावरील नागरिकांची तारांबळ

पावसाने रस्ते झाले जलमय..

उकाड्याने ग्रस्त नागरिकांना मिळाला दिलासा

अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या न्यायालयात आज सुनावणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाचवी सुनावणी आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर होत आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम सुनावणीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे या अगोदरच्या सुनावणीच्या वेळेस देखील सरकारी वकील उज्वल निकम गैरहजर होते त्यांच्या जागी विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले होते आज बीडच्या विशेष न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पाचवी सुनावणी होत आहे.

रायगडला लवकरच पालकमंत्री मिळेल - अजित पवार

रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. मात्र पालकमंत्री नसतानाही जिल्ह्यातील निधी खर्च व्हावा तो लॅप्स होऊ नये यासाठी प्रयत्न केले. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लोकसंख्येच्या निकषावर रायगड जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

नांदुरा येथील रेल्वे गेट लागल्याने ट्रॅफिक, तब्बल तीन किलोमीटर वाहनाच्या रांगा

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे रेल्वे गेट लागल्याने मोठी ट्रॅफिक जाम झाली होती .. वाहनाच्या तब्बल तीन दोन तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. . यामुळे दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र याचा मोठा त्रास सहन करावा लागला .. नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावर रेल्वे चे गेट असून याठिकाणावरून सुपरफास्ट रेल्वे गाडी जात असल्याने नेहमीच गेट बंद करावे लागते .. दरम्यान नांदुरा वरून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या वाहनाच्या याठिकाणी नेहमीच रांगा लागतात. . सोबतच याला लागून जुना मलकापूर ते नागपूर हायवे आहे . त्यावर सुद्धा मोठी वाहनाची गर्दी असते , त्यामुळे याठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते .. याठिकाणी उड्डाणपूल ची मागणी जुनी असून अद्याप याकडे आतापर्यंत अधिकारी , राजकीय व्यक्तीनि कानाडोळा केलेला दिसतोय ..

लोहारा, उमरगा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

धाराशिव च्या लोहारा,उमरगा शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले आहे.अनेक ठिकाणी झाडे तुटुन पडली तर विजेच्या तारा देखील तुटल्या आहेत.कास्ती खुर्द या गावात शेतात झाड पडुन शेतकऱ्याची म्हैस दगावली तर लोहारा शहरातील झिंगाटे प्लॉट मध्ये घरासमोर झाड पडुन कारचे नुकसान झाले. जवळपास तासभर झालेल्या पावसाने कांद्यासह फळपिकांचे व भाजीपाल्याचे देखील नुकसान झाल आहे तर अनेक भागता विजपुरठा खंडीत झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर तडे – अपघाताचा धोका वाढला, तातडीच्या दुरुस्तीसाठी नागरिकांची मागणी..

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला-आर्णी १६१ या राष्ट्रीय महामार्गावरील वनोजा ते मंगरुळपीर दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठे तडे गेले असून, हे तडे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी लवकरात लवकर या महामार्गाची डागडुजी करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी अवकाळी पावसाची हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली...काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांमुळे हवामान खात्याने अवकाळी ची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झालाय.

Maharashtra News Live Updates : जालन्यात सलग चार दिवसापासून अवकाळीचा कहर, पुढील चार दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील झाडे उखडून पडली आहे. जिल्ह्यात विज पडून दोघांचा दुर्दैव मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहे. जालन्यातील सराटे वझर शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडे उकडून पडली आहे तर भोकरदन तालुक्यातील भायडी शिवारात वीज पडून रामदास फड यांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे तर केदारखेडा येथील राहुल जाधव या तरुणाचा देखील वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मागील चार दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय तर पुढील चार दिवस हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.