Shisena News : शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. एकनात शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचे वाद दिसून येतात. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसून येतात. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मिलिंद नार्वेकर यांना आपल्या फेसबूकवर पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहेत.
शिदेंच्या नेत्याने नेत्याला शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. या निमित्ताने नार्वेकर यांच्या विषयी शिंदेंच्या नेत्यांना साॅफ्ट काॅर्नर नाही नाही ना, असे देखील बोलले जात आहे. तर, महाराष्ट्राचे राजकारण हे सुसंस्कृत आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याच्या भावना देखील शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
कोण आहेत भाऊसाहेब चौधरी?भाऊसाहेब चौधरी हे चे विश्वासू नेते समजले जातात. ते शिवसेनेचे नेते तसचे सचिव देखील आहेत. नाशिकच्या संपर्कप्रमुखपदाची पूर्वी जबाबदारी देखील त्यांच्यावर होती. शिवसेनेत फूट पडण्याआधी ते संजय राऊत यांचे कट्टर समर्थक समजले जात होते.कल्याण डोंबिवली महापालिकेत त्यांनी सभापतीपद भूषवले आहे तसेच डोंबिवली शहराचे शिवसेना शहरप्रमुख देखील होते.
चौधरी यांच्या फेसबूक पोस्टमध्ये नेमके काय?भाऊसाहेब चौधरी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'विधान परिषदेचे आमदार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अपेक्स कौन्सिल सदस्य श्री. मिलिंद जी नार्वेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.आपणांस कायम उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभू दे हीच कायम सदिच्छा !' चौधरी यांनी आपली पोस्ट मिलिंद नार्वेकर यांना टॅग केली आहे. तसेच मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत आपला फोटो देखील शेअर केला आहे.
मैत्रीचे संबंध कायम...महाराष्ट्राच्या राजकीय इतिहास पाहिला तर राजकारण विरहित मैत्री असलेले आपण पाहिले आहेत. मिलिंदजी नार्वेकर यांच्यासोबत जे मैत्रीचे संबंध आहेत ते आजही टिकून आहेत. आम्ही पूर्वी एकत्र काम केलं आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सोबत सचिव म्हणून काम करत असताना पक्षाचे हित बघूनच काम करतो आहे.