IPL 2025 : आरसीबीला प्लेऑफआधी मोठा झटका, मॅचविनर 18 व्या मोसमातून आऊट, कुणाला संधी?
GH News May 19, 2025 06:08 PM

गुजरात टायटन्सने रविवारी 18 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान गुजरातच्या शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. गुजरातने 19 ओव्हरमध्ये 205 रन्स केल्या. गुजरातचा हा नववा विजय ठरला. गुजरातने यासह प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं. तसेच गुजरातच्या या विजयामुळे आरसीबी आणि पंजाब किंग्सनेही प्लेऑफमध्ये धडक दिली. मात्र आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचताच वाईट बातमी मिळाली आहे. आरसीबीचा मॅचविनर खेळाडू उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.त्यामुळे आरसीबी टीम मॅनेजमेंटने बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आयपीएल 2025 मध्ये आरसीबीकडून खेळतोय. जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना होणार आहे. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना 26 मे पर्यंत मायदेशी बोलावलं आहे. त्यामुळे लुंगीला आरसीबीसोबत शेवटपर्यंत थांबता येणार नाही. त्यामुळे आरसीबीने लुंगीच्या जागी झिंबाब्वेचा उंचपुरा गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याला संधी दिली आहे. आरसीबीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

लुंगी 23 मे रोजी त्याचा आयपीएल 2025 मधील शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यात आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. त्यांनतर लुंगी मायदेशी रवाना होईल. तर आरसीबीच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आणि प्लेऑफमध्ये मुझरबानी याला संधी मिळू शकते.

ब्लेसिंग मुझरबानी याची उंची 6 फुट 8 इंच इतकी आहे. झिंबाब्वेच्या या 28 वर्षीय गोलंदाजाने आतापर्यंत 70 टी 20, 55 एकदिवसीय आणि 12 कसोटी सामने खेळले आहेत. ब्लेसिंगने कसोटीत 51, वनडेत 69 आणि टी 20I मध्ये 78 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्लेसिंग मुझरबानी याचा आरसीबीत समावेश

आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये कुठे?

दरम्यान आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत.आरसीबीने त्यापैकी 8 सामने जिंकले आहेत. आरसीबीला 3 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर एक सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात 17 गुण आहेत. आरसीबीचा नेट रनरेट हा +0.482 असा आहे. तसेच आरसीबी 23 मेनंतर 27 तारखेला साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना खेळणार आहे. आरसीबी या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध भिडणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.