सध्या मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अलिकडेच 'गुलकंद', 'झापुक झूपूक', 'देवमाणूस' आणि 'आता थांबायचं नाय' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशात आता अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मराठी सृष्टीतील एक नवीन फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. लवकरच 'कप बशी' (Cupbashi ) या चित्रपटांतून पूजा सावंत (Pooja Sawant ) आणि ऋषी मनोहर (Rishi Manohar) ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
'' या चित्रपटाची निर्मिती कल्पक सदानंद जोशी करणार आहेत. त्यांचं चित्रपटसृष्टीशी जुने नाते आहे. त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'पुत्रवती' या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केलं होतं. या चित्रपटाला राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यामुळे वडीलांचे प्रेरणादायी काम आणि त्यांचा कलात्मक वारसा मनोहर 'कप बशी' चित्रपटातून ते पुढे आणत आहेत.
कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाइन, पुढचं पाऊल अशा गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर या चित्रपटातून नवीन कथा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या चित्रपटात पूजा सावंत आणि ऋषी मनोहर सोबतच अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. सावंतनं आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर ऋषि मनोहरनं टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचला आहे.
पूजा सावंत आणि ऋषी मनोहर या दोघांच्या फ्रेश जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाचे रिलीज अपडेट अद्याप जाहीर करण्यात आले नाही आहे.