Heart Health : टोमॅटो हृदयासाठी फायदेशीर
Marathi May 19, 2025 07:26 PM

बदलती लाइस्टाइल आणि चुकिच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हृदयाशी संबंधित आजार कोणत्याही वयोगटात होत आहेत. त्यामुळे तज्ज्ञमंडळी हृदय निरोगी राहण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि हेल्दी आहार खाण्याचा सल्ला देत आहेत. अशा वेळी हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही एक भाजी नक्कीच खायला हवी ते म्हणजे टोमॅटो. टोमॅटो स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध होणारी भाजी आहे. टोमॅटोच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत मिळते. टोमॅटो एक सुपरफूड आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. त्यामुळे टोमॅटो खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास कशी मदत होते, हे जाणून घेऊयात.

टोमॅटोचे फायदे –

  1. टोमॅटोमध्ये असणारे लाइकोपीन नावाचे ऍटी-ऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ आणि लवचिक ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  2. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी टोमॅटोचे सेवन करणे फायदेशीर आहे. टोमॅटो खाल्लाने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका कमी होतो.
  3. टोमॅटोमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते. पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे जेव्हा तुम्ही टोमॅटो खाता तेव्हा हृदयावर दाब कमी पडतो आणि त्याचे कार्य अधिक सुधारते.
  4. टोमॅटोमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील दाह कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला वारंवार जळजळीचा त्रास असेल तर टोमॅटोचे सेवन करावे.
  5. टोमॅटो रक्तपातळ करण्यास फायदेशीर असते. रक्त पातळ झाल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखले जाते आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. विशेष करून कच्चे टोमॅटो या प्रकरणात प्रभावी ठरतात.
  6. टोमॅटोमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, जे वेट लॉससाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे वेट लॉसच्या प्रयत्नात असाल टोमॅटोचे सेवन करावे.

दररोज टोमॅटो खाऊ शकतो का?

हो, तुम्ही दररोज टोमॅटो खाऊ शकता, कच्चे टोमॅटो सॅलेड स्वरूपात खाऊ शकता.

 

 

हे ही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.