छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असल्या तरी वाहिन्यांमध्ये आणि मालिकांमध्ये टीआरपीची स्पर्धा असते. त्यात ज्या मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो ती मालिका टीआरपीमध्ये सगळ्यांच्या वरचढ ठरते. मात्र ज्या मालिका प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यात अयशस्वी ठरतात त्या मालिका थेट बंद करण्याचा निर्णय चॅनेलकडून घेतला जातो. कलर्स मराठीवरील अशाच एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने पोस्ट करत या बातमीला दुजोरा दिलाय आणि भावनिक पोस्ट शेअर केलीये.
अलिकडेच कमी टीआरपी अभावी अनेक मालिकांनी बंद झाल्या आहेत. अशातच आता आणखी एक मालिका बंद करण्यात आलीये. कलर्स मराठीवरील 'लय लय आवडतेस तू मला' ही मालिका आता बंद झालीये. १८ मे रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं. त्यानंतर मालिकेतील मुख्य अभिनेत्री सानिका मोजार हिने भावून पोस्ट शेअर केली आहे. सानिकाने मालिकेत सानिका पाटील ही भूमिका साकारली आहे. एक आगळीवेगळी प्रेमकथा सांगणाऱ्या या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलाय.
सानिकाने पोस्ट करत लिहिलं, 'सानिका निरोप घेत आहे..., शूट पूर्ण झालं आहे. सानिकाचा प्रवास जगल्याबद्दल कृतज्ञ आहे. तिची ताकद, तिचे दोष, तिच्या नजरेतील अंगार ती नेहमीच माझा आयुष्याचा एक भाग राहील. तिला दिलेल्या प्रत्येक प्रेमाबद्दल आणि या सुंदर प्रवासाचा भाग असल्याबद्दल धन्यवाद...'. याशिवाय काही दिवसांपूर्वीच अभिनेता तन्मय जक्काने यासंदर्भात पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट दिली होती. त्यामुळे अवघ्या सात महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यावर आता शिक्कमोर्तब झालंय.
या मालिकेचे प्रेक्षक मात्र ही मालिका बंद झाली म्हणून नाराज आहेत. तर आता कलर्सवर नवीन कोणती मालिका येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे,