पार्किंगच्या वादातून चार जणांवर चाॅपरने हल्ला
भिवंडी, ता. १९ (वार्ताहर)ः तालुक्यातील कोनगाव येथे पार्किंगच्या वादातून एका माथेफिरूने चार जणांवर चाॅपर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनिकेत पुजारी व साहिल शेख अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोनगाव येथील वेदांत अपार्टमेंट येथे शनिवारी (ता.१९) सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास चालक अनिकेत चैनू पाटील व त्याचा मित्र राहुल अर्जुन गुप्ता यांचे अनिकेत पुजारी यांच्याशी गाडी पार्किंगवरुन वाद झाले. या वादात, अनिकेत पुजारी व साहिल यांनी आपसात संगनमत करुन अनिकेत पाटील व त्याच्या मित्रास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने मारहाण करुन चॉपरने वार केले. या हल्ल्यात अनिकेत पाटील यांसह मित्र राहुल गुप्ता, शुभम गुप्ता, ऋषीकेश चव्हाण हे चार जण जखमी झाले. याप्रकरणी अनिकेत पाटील याने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात अनिकेत पुजारी व साहिल शेख अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी साहिलला पोलिसांनी अटक केली आहे.