Maharashtra Politics: महायुतीत वार-पलटवार सुरु; सुनील तटकरेंच्या टीकेला भरत गोगावलेंकडून जोरदार प्रत्युत्तर
Saam TV May 19, 2025 10:45 PM

रायगड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात राजकीय घमासान आहे. महाविकासआघाडी सरकार काळात देखील पालकमंत्री पदावरून सुरू झालेला संघर्ष हा आताच्या महायुती सरकारमध्ये देखील आहे. पालकमंत्रीपदावरून अजूनही या दोघांमध्ये मोठा वाद आहे. काही दिवसांपूर्वी रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

या दरम्यान सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली असल्याचे पाहायला मिळाले. खांद्यावर रुमाल ठेवत आणि हात जोडून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची स्टाईल करून दाखवली होती. या नक्कलीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे.

महाड विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी अजित पवार गटात सुनील तटकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी तटकरे यांनी गोगावलेची नक्कल केली

आता यानंतर यांनी यावर प्रतिक्रिया देत सुनील तटकरे यांच्यावर पलटवार केला. भरतशेठच्या नॅपकिनची नक्कल सर्वांनाच करता येणार नाही. नॅपकिन आम्ही वेटर सारखा खांद्यावर घेत नाही, नॅपकिनमध्ये काय आहे, तर गोरगरीबांचे आशिर्वाद आहेत असे सांगताना मी काल परवापासून नॅपकिन वापरत नाही तर अनेक वर्षांपासून वापरतोय. आता मला ती सवय झाली असल्याचे गोगावले म्हणाले.

तुम्हाला सवय करायची असेल तर आम्ही ट्रेनिंग देऊ असा खोचक टोला गोगावले यांनी तटकरे यांना लगावला. तटकरे यांनी केलेल्या नक्कलीचा धागा पकडत, आम्हाला वाटत नव्हत इतके नकलाकार असतील, त्यांचा पाऊस उघडल्यावर एखादा कार्यक्रम लावू असा इशारा देखील गोगावले यांनी तटकरे यांना दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.