डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
जच्या तरुणींमध्ये पीसीओएस (Polycystic Ovary Syndrome) ही समस्या झपाट्याने वाढते आहे. दहापैकी दर तीन मुलींना आज पीसीओएस आहे. केस गळणं, अनियमित पाळी, वजनवाढ, चेहऱ्यावर भरपूर मुरूम, गळ्यावर गडद काळे डाग (Acanthosis nigricans) - ही केवळ वरची लक्षणं आहेत. बऱ्याच जणींना हार्मोनल (OC pills) गोळ्या दिल्या जातात; पण त्या बंद केल्या, की लक्षणं परत येतात. मग खरं कारण काय?
पीसीओएस ही केवळ हार्मोन्सची समस्या नाही, तर ती मेटाबॉलिक डिसॉर्डर आहे. म्हणजेच, शरीरातील ऊर्जेचं नियमन (metabolism) बिघडलेलं असतं - विशेषतः इन्शुलिनचं!
इन्शुलिन रेझिस्टन्स हे पीसीओएसचं मूलभूत कारण असू शकतं. इन्शुलिन हे रक्तातील साखर पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम करतं; पण शरीर त्याला प्रतिसाद देईनासं झालं, की साखर रक्तातच राहते आणि शरीर अधिकाधिक इन्शुलिन तयार करतं. याचा परिणाम अंडाशयावर होतो - अंडी निर्माण होणं थांबतं, टेस्टोस्टेरॉन वाढतो आणि पीसीओएसची लक्षणं सुरू होतात.
फंक्शनल मेडिसिनमध्ये उपचार हा केवळ लक्षणांवर नसतो, तर मुळाशी जाऊन केला जातो. मुख्य भर दिला जातो :
इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यावर भर : रक्तातील साखर स्थिर ठेवणारा आहार
ओव्हरऑल वजन कमी करण्याऐवजी फॅट लॉस साधणं : इंच लॉस
जठरस्वास्थ्य सुधारण्यावर भर : कारण ते थेट हार्मोन्सशी जोडलेलं असतं, ‘Gut हेल्थ’सुद्धा महत्त्वाची
तणाव कमी करणं : कोर्टिसोल वाढला, की इन्शुलिनवर परिणाम होतो
योग्य व्यायाम : अतिमात्रा कार्डिओ नव्हे, तर स्नायू वाढवणारे स्ट्रेंथ ट्रेनिंग
पीसीओएसचा अर्थ फक्त सिस्ट्स असणं नव्हे. अनेक जणींना सिस्ट्स नसतानाही इतर सर्व लक्षणं जाणवतात. त्यामुळे निदान हे लक्षणांवर आणि बायोमार्कर्सवर आधारित असावं.
पीसीओएस रिव्हर्स करता येतो – MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्टहे फक्त सेक्स हार्मोन्स नॉर्मल करून नाही, तर मेटाबॉलिक हार्मोन्ससुद्धा. शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक समतोल साधूनच ते शक्य आहे. म्हणूनच, दीर्घकालीन उपाय हवा असेल, तर फक्त गोळ्यांवर न थांबता शरीराचं मूळ संतुलन पुन्हा मिळवण्यावर लक्ष द्या - आणि हेच खरे सामर्थ्य आहे.