Political Live Update : अरुण डोंगळे यांनी दिला 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा; सूत्रांची माहिती
Sarkarnama May 20, 2025 04:45 PM
Gokul Arun Dongale : अरुण डोंगळे यांनी दिला 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा; सूत्रांची माहिती

अरुण डोंगळे यांनी 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 'गोकुळ'चे एमडी यांच्याकडे हा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. गोकुळ अध्यक्षपदाच्या संघर्षात नेत्यांनी 18 संचालकांची एकजूट बांधली असल्याने डोंगळे एकाकी पडले आहे.

Minister Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळांना धनंजय मुंडे यांचेच खातं मिळालं

धनंजय मुंडे महायुतीच्या मंत्रिमंडळात असताना, त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग हे खातं होते. त्यांचेच खाते छगन भुजबळ यांना मिळाले आहे. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनात आपलं संपूर्ण सहकार्य राहील, असे मंत्री भुजबळ यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal NCP : मंत्री छगन भुजबळ यांना धनंजय मुंडे यांचे दालन मिळणार

एनसीपी बीडचे आमदार धनंजय मुंडे यांचे मंत्रालयातील दालन मंत्री छगन भुजबळ यांना मिळणार आहे. मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यांपासून हे दालन बंद होते.

Operation Sindoor : भारताविरोधात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून आतापर्यंत 12 जणांना अटक

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरोधात भारताने जोरदार कारवाई सुरू केली आहे. आठवड्याभरात हेरगिरीच्या संशयावरून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यात सहा जण पंजाबचे आहेत. चार जण हरियाणामधील आहेत. दोघे उत्तर प्रदेशमधील आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यूट्यूब ब्लाॅगर ज्योती मल्होत्राचा देखील मावेश आहे.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोणतं खातं मिळणार; नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढला

महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांना कोणतं मंत्रिमंडळात कोणतं खातं मिळणार, याकडे आता लक्ष असणार आहे. याचबरोबर नाशिकचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार, याचा देखील तिढा वाढला आहे.

Jayant Narlikar Passes Away : डॉ. जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड..

जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. आज सकाळी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जयंत नारळीकर यांचा आंतररष्ट्रीय स्तरावर खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता. ते रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहीण्यासाठी लोकप्रीय होते. केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले होते. आधी टाटा मुलभुत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहीला. २०२१ मधे नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

Amit Shah : अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर शाह पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. तर 26 मे रोजी त्यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे.

श्री जय भवानीमाता पॅनेलेचे उमेदवार व मिळालेली अंतिम मते

गट नंबर - १ पृथ्वीराज साहेबराव जाचक ( ११६९४), अॅड.शरद शिवाजी जामदार (१०५२९),

गट नंबर-२ रामचंद्र विनायक निंबाळकर (१०९२९) , शिवाजी रामराव निंबाळकर (१०४३१)

गट नंबर -३ पृथ्वीराज श्रीनिवास घोलप (९६७२) , गणपत सोपाना कदम ( ९२९७) .

गट क्रमांक- ४ प्रशांत दासा दराडे (१११८०), अजित

हरिश्चंद्र नरुटे (११०९०) , विठ्ठल पांडुरंग शिंगाडे ( १०२३५)

गट क्रमांक - ५ अनिल सिताराम काटेे ( ११७८९), बाळासाहेब बापुराव कोळेकर (११७६८ ) , संतोष शिवाजी मासाळ (१०३०५)

गट क्रमांक - ६ कैलास रामचंद्र गावडे (११८३२), निलेेश दत्तात्रेय टिळेकर (११५६३) सतीश बापुराव देवकाते (११२६१)

-

इतर मागास प्रवर्ग

तानाजी ज्ञानदेव शिंदे ( ११३५८)

-

अनुसूचित जाती जमाती

मंथन बबनराव कांबळे ( ११५११)

--

महिला राखीव

सुचिता सचिन सपकळ (१०३८४)

माधुरी सागर राजापुरे (१०७७४)

-

भटक्या विमुक्त जाती

डॉ.योगेश बाबासाहेब पाटील (११८४३)

---

ब वर्ग - अशोक संभाजी पाटील ( २८०)

----

श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार

गट नंबर - १ संजय साेमनाथ निंबाळकर ( ४८५०) , प्रताप मोहन पवार (४१९७)

गट नंबर - २ संग्रामसिंह दत्तात्रेय निंबाळकर ( ५१६५) , महादेव बाळू सिरसट (३९५७)

गट नंबर - ३ करणसिंह अविनाश घोलप (६९६१) , तानाजी साहेबराव थोरात (४७२१)

गट नंबर - ४ बाबासाहेब भगवान झगडे (४९४०), राजेंद्रकुमार बलभिम पाटील (४८६०)

गट क्रमांक - ५ रवींद्र भिमराव टकले (५४८२)

गट क्रमांक - ६ नितीन अशोक काटे (५४३४) )

-

इतर मागास प्रवर्ग

संदीप वसंतराव बनकर ( ५१६७)

अनुसूचित जाती जमाती

बाबासाहेब कांबळे ( ४९६१)

महिला राखीव

सिता रामचंद्र जामदार (४२८५)

पद्मजा विराज भोसले (४५४५)

छत्रपती साखर कारखान्यावर अजितदादांचेच वर्चस्व

इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल समोर आला असून पुन्हा एकदा या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर श्री छत्रपती बचाव पॅनलचा दारूण पराभव झाला.

Supreme Court : भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे - सुप्रीम कोर्ट

भारत काही धर्मशाळा नाही की, संपूर्ण जगातील निर्वासितांना येथे आसरा द्यावा, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका श्रीलंकन तामिळ व्यक्तीच्या याचेकेवरील सुनावणीदरम्यान नोंदवलं आहे.

Chhagan Bhujbal : अखेर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार

महाराष्ट्रातील राजकारण मोठी घडामोड घडणार आहे. ती म्हणजे महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राज्य मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना स्थान दिलं नव्हतं. तेव्हापासून नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. आज छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असून मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.