ALSO READ:
मिळालेल्या माहितनुसार छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जाणारी कार टायर फुटल्याने उलटली. या अपघातात २ वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगाव जंक्शनजवळ सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ALSO READ:
अपघात इतका भीषण होता की परिसरात घबराट पसरली. सौंदलगाव, वाडीगोद्री आणि परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाडीचे दरवाजे तोडून सर्वांना बाहेर काढले आणि पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात गाडी पूर्णपणे चुराडा झाली. या घटनेची नोंद गोंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून गोंदी पोलिस पुढील तपास करत आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: