पीव्ही सिल्हू: वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटन स्टेट पी.एस. व्ही. इंडस्ट्रीज
Marathi May 21, 2025 03:25 PM

भारतातील सर्वात प्रभावशाली बॅडमिंटनपटूंपैकी एक म्हणजे पी.व्ही. सिंधू. तिचे पूर्ण नाव पुसारला वेंकट सिंधू. सिंधूचे वडील पीव्ही रमण आणि सिंधूची आई हे व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. मात्र असं जरी असलं तरी तिला तिच्या आई-वडिलांच्या खेळाचे मैदान, व्हॉलीबॉल यांचे आकर्षण नव्हते, त्याऐवजी तिने बॅडमिंटन खेळणे पसंत केले. जाणून घेऊयात ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाचे नाव उंचावणाऱ्या पी. व्ही. सिंधूविषयी.

पी. व्ही. सिंधूचा जन्म 5 जुलै 1995 रोजी तेलुगू वारसा असलेल्या कुटुंबात झाला आणि ती हैदराबादमध्ये वाढली. पीव्ही सिंधूने तिचे सुरुवातीचे शालेय शिक्षण सिकंदराबाद येथील ऑक्झिलियम हायस्कूलमधून केले. त्यानंतर तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण सेंट अॅन कॉलेज फॉर वुमन, मेहदीपट्टणम येथून केले. तिने वयाच्या आठव्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सिकंदराबाद येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनीअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये बॅडमिंटनच्या मूलभूत गोष्टी शिकण्यास सुरुवात केली. हा खेळ शिकण्यासाठी आणि सराव करण्यासाठी ती आपल्या राहत्या घरापासून बॅडमिंटन कोर्टपर्यंत दररोज 56 किमीचा प्रवास करत असे. आणि नंतर तिने पुल्लेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रवेश केला.

तिची पहिली ओळख 10 वर्षांखालील गटातील 5 व्या ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिपच्या रूपाने झाली. 13 वर्षांखालील गटात तिने पुण्यातील सब-ज्युनियर राष्ट्रीय आणि अखिल भारतीय क्रमवारीत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. भारतातील 51व्या राष्ट्रीय शालेय खेळांमध्येही तिने 14 वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले.

सिंधूने 2010 साली इराण फजर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये रौप्यपदक जिंकले. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत रौप्य आणि मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने 2019 च्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, ज्यामुळे ती सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आणि चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंतची सर्वात यशस्वी भारतीय बनली. रिओ ऑलिंपिक 2016 मध्ये रौप्य पदक आणि टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये तिने कांस्य पदक पटकावले.

सिंधूच्या कामगिरीची दखल घेत, भारत सरकारने तिला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. तसेच ती भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्रीची प्राप्तकर्ता आहे. 2020 मध्ये तिला प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा : Garlic Chutney Recipe : लसणाची चटणी


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.