International Tea Day 2025 : चहाप्रेमींनो, चहाचे हे प्रकार माहिती आहेत का?
Marathi May 21, 2025 06:26 PM

चहाला वेळ नसते पण, वेळेला चहा हा हवाच. चहा हा अनेकांच्या दैंनदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. त्यामुळे भारतीयांच्या सकाळची सुरूवातच चहाने होते. चहा प्यायल्याने उबदारपणा, रिफ्रेशिंग वाटते. उन्हाळा असो वा हिवाळा, चहा प्रेमींना प्रत्येक ऋतूत चहा प्यायला आवडतो. असं म्हणतात की, चहा भारतात इंग्रजांनी आणला. पण, जवळपास 2000 वर्षांपूर्वी भारतातीलच एका बौद्ध भिक्षूने चहाचा शोध लावला असेही सांगितले जाते. असो..चहा कोणी का आणेना आज चहा भारतीयांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे एवढे मात्र नक्की.. अनेकदा चहा आरोग्यदायी नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तज्ज्ञमंडळी चहाचे अतिसेवन योग्य नाही, असे सांगतात किंवा दुधाचा चहा पिऊ नये, असे सांगतात. आज 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. याच दिनानिमित्त आज आपण जाणून घेऊयात आरोग्यासाठी उत्तम असलेले चहाचे प्रकार

चहाचे प्रकार –

ब्लॅक टी –

ब्लॅक टी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वजन कमी करणाऱ्यांना ब्लॅक टी पिण्याचा सल्ला दिला जातो. ब्लॅक टी च्या सेवनाने शरीराला फ्लेव्होनाइड्स आणि ऍटी-इफ्ल्मेंटरि गुणधर्म मिळतात, जे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. डायबिटीज आणि हृदयाच्या संबंधित समस्यांवर ब्लॅक टी उत्तम सांगण्यात येतो.

आले टी –

जिंजर टी अर्थात आल्याचा चहा उलटी, पोटदुखी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय असतो. आल्याच्या चहामध्ये जळजळ-विरोधी गुणधर्म असतात.

ग्रीन टी –

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि हाय कोलेस्ट्ऱॉल कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असतो. हा चहा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी असा दोन वेळा पिऊ शकता.

लिंबू चहा –

व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेला हा चहा रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतो. यात पोटॅशियम, झिंक, तांबे, मॅग्नेशियमसारखी पोषकतत्वे असतात, जे मेंदूच्या आरोग्यास चालना देऊ शकतात.

पांढरा चहा –

पांढरा चहा हा कमी लोकप्रिय असलेला चहा आहे. इतर चहाच्या तुलनेत या चहामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. हा चहा चयापचय क्रिया वाढवण्यासाठी फायदेशीर असतो. तसेच त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

 

 

 

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.