COVID-19: गेल्या काही आठवड्यांपासून आशियामध्ये, विशेषतः हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. भारतातही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सोमवार, 19 मे पर्यंत 257 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग देखील सतर्क झालं आहे. JN.1 व्हेरिएंट जो ओमिक्रॉनचा देखील एक प्रकार आहे आणि संपूर्ण जगात पसरत आहे. अशात महामारीच्या काळात लसीकरणामुळे कोरोना नियंत्रणास आणण्यात मदत झाली.
आता शास्त्रज्ञांनी पारंपारिक कोरोना लसींना एक नवीन आणि आशादायक पर्याय शोधला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की नवीन पर्याय कोरोनावर मात करण्यासाठी अधिक सुरक्षित, अधिक प्रभावी असू शकतो. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विषाणू शरीरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी म्हणजेच नाकातून थांबवू शकतो.
सांगायचं झालं तर, आतापर्यंत हातावर लसीकरण करण्यात आलं. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत झाली. पण Yale University च्या शास्त्रज्ञांनी नवीन संशोधन केलं आहे. ज्यामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी नाकावाटे दिली जाणारी लस अधिक फायद्याची ठरेल. नातातून दिल्या जाणाऱ्या लसीला ‘नेझल व्हॅक्सीन’ म्हणतात. विशेषतः कोरोनासारख्या श्वासोच्छवासाद्वारे पसरणाऱ्या आजारांसाठी.
इंजेक्शनच्या माध्यमातून दिली जाणारी लस पूर्ण शरीरात पसरते. पण नाकावाटे दिली जाणारी व्हॅक्सिन जेथून कोरोनावर मात करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. कारण नाकातून दिली जाणारी व्हॅक्सिन आधी नाक आणि त्यानंतर घश्यापर्यंत पोहोचते. ज्यामुळे कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
सांगायचं झालं तर, नाकाद्वारे दिलेली लस शरीराच्या प्रवेश बिंदूवर विषाणू थांबवण्यासाठी अधिक प्रभावी असू शकते, तर इंजेक्शनद्वारे दिलेली लस संपूर्ण शरीराचे संरक्षण करते.
येल स्कूल ऑफ मेडिसिन (YSM) येथील इम्युनोबायोलॉजीचे प्राध्यापक अकिको इवासाकी म्हणतात, “आमच्या अभ्यासातून असं दिसून येतं की एक लहान व्हायरल प्रोटीन आपल्या श्वसनमार्गात विषाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती कशी निर्माण करू शकते.
मिळालेल्या माहितीतून असं दिसून येतं की नाकात टाकल्या जाणाऱ्या स्प्रेमध्ये असलेले व्हायरल प्रोटीन विषाणू शरीरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी, म्हणजेच नाकात सुरक्षितपणे विषाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करू शकतात.. असं देखील इवासाकी म्हणाल्या आहेत.
कोरोनाशी लढण्यासाठी नाकाची लस अधिक प्रभावी ठरू शकते असं शास्त्रज्ञांनी निरीक्षण केलं आहे. त्यांनी प्रथम उंदरांवर एक प्रयोग केला. सर्वांत आधी त्यांनी सामान्य कोरोना लस इंजेक्शनद्वारे दिली, नंतर नाकातून ‘बूस्टर’ लस दिली.