
धुळ्यातील सरकारी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांची वसूली सुरू असल्याचे धक्कदायक वृत्त समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. विश्रामगृहातील वसूलीची माहिती मिळताच धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक मारली. मात्र त्या मंत्र्यांचा खासगी सचिव खोलीला टाळं लावून पळून गेले. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी सरकारला फटकारले आहे.
”महाराष्ट्रात नक्की काय सुरू आहे? धुळे विश्राम गृहात (no 102) राज्याच्या एका कैबिनेट मंत्र्याच्या वतीने काही दिवस वसुली सुरू होती. आज संध्याकाळी अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीस लॉक लावून पळून गेले. खोलीत किमान 5 कोटी रुपये आहेत. कलेक्टर च्या उपस्थितीत खोली उघडावी एवढीच अपेक्षा आहे. पण सगळेच पळ काढत आहेत,चोरांचे सरकार चोरांना सरंक्षण, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.