मोहोळ - मोहोळ विधानसभा मतदार संघातील चार गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब आमदार राजू खरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर ,त्यांनी 17 मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती.
त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा प्रश्न सोडविण्या बाबत शब्द दिला होता.या प्रश्नावर बुधवार ता.21 रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक घेत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या समोर आगृह धरत आमदार राजू खरे यांच्या मागणीची दखल घेतली.
व कोळेगाव एस के एफ 22 मधून सिना नदीत पाणी सोडण्याबाबतच्या ऑनलाईन सूचना पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहेत. यामुळे त्या चार गावचा पाणी प्रश्न निकाली निघाला असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी दिली.
मोहोळ विधानसभा मतदार संघातील मुंडेवाडी,अर्जुंनसोंड, पोफळी,नांदगाव या गावांतील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या बाबत आमदार राजू खरे यांनी आवाज उठवला होता, त्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
बुधवार ता. 21रोजी मंत्रालयात कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जलसंपदा मंत्री विखे पाटील, ग्राम विकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजू खरे, आमदार समाधान अवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार, अभिजीत पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार उत्तमराव जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार सुभाष देशमुख तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, सुधीर खांडेकर व जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.