ऑपरेशन सिंदूरनंतर ड्रोन कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, शेअर्समध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ
ET Marathi May 22, 2025 12:45 PM
मुंबई : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) नंतर ड्रोन उत्पादक कंपन्यांच्या शेअर्स (drone companies Shares) मध्ये तुफान तेजी दिसून आली. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने ७-८ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. यानंतर, ड्रोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे या गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा झाला आहे.आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी, पारस डिफेन्स, झेन टेक्नॉलॉजीज, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज यासारख्या आघाडीच्या संरक्षण आणि एरोस्पेस कंपन्यांच्या शेअर्समध्ये ७-८ मे पासून ८ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. झेन टेक्नॉलॉजीजझेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये ७ मे पासून ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स ६ मे २०२५ रोजी १,३५७.५५ रुपयांवर बंद झाले. तर मंगळवारी ते १,९०२.०५ रुपयांवर बंद झाले. अशाप्रकारे, ९ ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्सने ४०% ची मोठी वाढ केली आहे. झेन टेक्नॉलॉजीज विविध प्रकारच्या संरक्षण प्रशिक्षण प्रणाली, लाईव्ह रेंज वेपन्स आणि अँटी-ड्रोन सिस्टीमची रचना, विकास आणि निर्मिती करते. कंपनीच्या काही प्रमुख उत्पादनांमध्ये प्रहस्त आणि ड्रोनविरोधी शस्त्रे यांचा समावेश आहे. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी७ मे रोजी झालेल्या लष्कराच्या कारवाईनंतर आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये ४८% वाढ झाली आहे. ६ मे २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ३६२.८५ रुपयांवर बंद झाले. तर मंगळवारी (२० मे) ते ५३९.४० रुपयांवर बंद झाले. अशाप्रकारे गेल्या ९ ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्स ४८.४८% ने वाढला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सऑपरेशन सिंदूरमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही कंपनी आकाश डिफेन्स सिस्टीम्सची निर्मिती करते. आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ७ मे २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ३१०.५५ रुपयांवर बंद झाले. तर मंगळवारी (२० मे) शेअर्सची बंद किंमत ३६३.७० रुपये होती. या कालावधीत शेअर्स १८% वाढला आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजपारस डिफेन्सच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली आहे. हा शेअर्स ७ मे २०२५ रोजी १,३५२.६५ रुपयांवर बंद झाला. तर मंगळवारी (२० मे) तो १,५९६.०५ रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे गेल्या ९ ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्सने १८% वाढ नोंदवली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्सऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) च्या शेअर्समध्येही सकारात्मक वाढ दिसून आली आहे. कंपनीचे शेअर्स ७ मे २०२५ रोजी ४,५०७.१० रुपयांवर बंद झाले. तर मंगळवारी (२० मे) ते ४,८५० रुपयांवर बंद झाले. गेल्या ९ ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर्स ८% ने वाढला आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.