अहिल्या नगर : राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून सख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.. अनेक वर्षांनंतर निळवंडे धरणाचे पाणी गावात पोहचल्याने साठवण बंधारा भरलेला होता.15 वर्षीय दिव्या प्रशांत डोशी आणि 12 वर्षीय साहिल प्रशांत डोशी हे बहीण-भाऊ पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते.. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला..
कोऱ्हाळे गावातील भांबारे मळा येथे निळवंडे पाण्याने साठवण बंधारा भरलेला होता. दिव्या आणि साहिल हे बहीण भाऊ 21 मे रोजी दुपारच्या सुमारास पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने या पाण्याचा साठा वाढलेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने दिव्या आणि साहिल यांचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय.
प्रवरा कारखान्याचे चेअरमन सुजय विखे यांचा शेजारील वाळकी गावात कार्यक्रमात सुरू असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला फोन करून घटनेची माहिती दिली. राहाता नगरपरिषद, शिर्डी नगरपरिषद, साईबाबा संस्थान यांच्या अग्निशमन दलांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली.
शिर्डीचे विभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे हे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.. दोन्ही बाहेर बाहेर शविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. राहता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस घटनेचा अधिक तपास करताय. या घटनेने डोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोऱ्हाळे परिसरात शोककळा पसरली आहे.