IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशीला संधी
GH News May 22, 2025 04:11 PM

टीम इंडिया आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय कनिष्ठ निवड समितीने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी अंडर 19 टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

वैभव सूर्यवंशीला संधी, मराठमोळ्या आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

इंग्लंड दौऱ्यसाठी निवड समितीने आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशी आणि मराठमोळ्या आयुष म्हात्रे याची निवड केली आहे. विशेष म्हणजे निवड समितीने आयुष म्हात्रेला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. अंडर टीम इंडिया विरुद्ध अंडर 19 टीम इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर 2 कसोटी सामने होणार आहेत.

अंडर 19 टीमचा इंग्लंड दौरा

अंडर 19 टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 24 जूनपासून होणार आहे. टीम इंडिया 24 जूनपासून प्रॅक्टीस मॅच (वनडे) खेळणार आहे. त्यानंतर 27 जूनपासून एकदिवलीय मालिकेला सुरुवात होईल. तर 7 जुलै रोजी पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना पार पडेल. त्यानंतर 2 सामन्यांच्या मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होईल. हे सामने 4 दिवसांचे असणार आहेत. पहिला सामना 12 ते 15 जुलै दरम्यान होईल. तर दुसरा आणि शेलवटचा सामना 20 ते 23 जुलै दरम्यान होणार आहे.

अंडर 19 टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

24 जून, मंगळवार, 50 षटकांचा सराव सामना

27 जून, शुक्रवार, पहिला एकदिवसीय सामना

30 जून, सोमवार, दुसरा एकदिवसीय सामना

2 जुलै, बुधवार, तिसरा एकदिवसीय सामना

5 जुलै, शनिवार, चौथा एकदिवसीय सामना

7 जुलै, सोमवार, पाचवा एकदिवसीय सामना

कसोटी मालिका

12 ते 15 जुलै, पहिला सामना

20 ते 23 जुलै, दुसरा सामना

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

इंग्लंड दौऱ्यासाठी अंडर 19 टीम इंडिया : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर एस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, युद्धजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा आणि अनमोलजीत सिंग.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.