Brave youth hugs crocodile in viral video: सोशल मिडियावर अनेक विचित्र आणि थक्क करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही मगरीशी संबंधित अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान होत आहे. ज्यात एक माणूस पाण्यात मगरीजवळ पोहोचतो. परंतु या माणसाने असं काही केलं ज्याची कल्पना करणे देखील कठीण आहे. तो माणूस मगरीला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासोबत डान्स करू लागतो हे दिसून येते.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो माणूस मगरीला जवळ घेतो, त्याचे पुढचे पाय धरून नाचताना दिसत आहे. जणू काही मगरच त्याची प्रियसी आहे असे वाटते. हे असे दृश्य आहे जे कोणालाही थक्क करणार आहे.
एवढेच नाही तर नृत्यानंतर तो मगरीला परत पाण्यात सोडतो. व्हायरल होत असलेला व्हिडिओ fishing.tribe नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत असलेले दृश्य कधीच पाहिले नसणार. या अनोख्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मगरीच्या इतक्या जवळ गेल्यानंतरही कोणी इतके आरामदायी कसं असू शकते हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे. काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिले की 'शौर्यवान आहेस' तर एका यूजरने लिहिले 'हा मूर्खपणा आहे' तर अनेकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ३७०२७१ लाईक्स मिळाले आहे.