Vaishnavi Hagawane Death Shocking information revealed that the Hagawane family tortured elder daughter-in-law Mayuri
Marathi May 22, 2025 10:29 PM


राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले राजेंद्र हगवणे यांची धाकटी सून वैष्णवी हिने 16 मे रोजी गळफास घेत आपले जीवन संपवले. पण आता या हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी केवळ वैष्णवीचाच नाही तर घरातील मोठी सून मयुरी हिचा सुद्धा छळ केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे : पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही हुंडाबळीच्या घटना घडत आहेत. एका उच्चभ्रू घरातील सुनेने सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात हुंडा अजूनही घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले राजेंद्र हगवणे यांची धाकटी सून वैष्णवी हिने 16 मे रोजी गळफास घेत आपले जीवन संपवले. तिने सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. पण आता या हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी केवळ वैष्णवीचाच नाही तर घरातील मोठी सून मयुरी हिचा सुद्धा छळ केला होता, अशी माहिती समोर आली आहे. मयुरी जगताप हगवणे हिने प्रसार माध्यमांसमोर तिच्यासोबत घडलेल्या क्रूर घटनेची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. (Vaishnavi Hagawane Death Shocking information revealed that the Hagawane family tortured elder daughter-in-law Mayuri)

मयुरी जगताप हगवणे ही हगवणे कुटुंबाची मोठी सून. मयुरीचा 2022 मध्ये सुशिल हगवणे (राजेंद्र हगवणेंचा मोठा मुलगा) याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसांमध्येच मयुरीला सुद्धा नणंद करिष्मा आणि सासू लता हगवणे यांनी त्रास द्यायला सुरुवात रेली होती. पती सुशिल घरी नसताना दीर शशांक, सासू, सासरा आणि नणंद या चौघांकडून बेदमपणे मारहाण केली जात होती. एकदा दीर शशांक याने मला केसाला धरून जोरात जमिनीवर आटपले असल्याची धक्कादायक माहिती मयुरीने दिली आहे. तर, सासरा राजेंद्र हगवणे याने विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही मयुरीकडून करण्यात आला आहे. मयुरीकडून तिला करण्यात आलेल्या मारहाणीचे फोटोही प्रसार माध्यमांना दाखवले आहेत.

हेही वाचा… Pune : वैष्णवी हगवणेप्रमाणे आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; 22 वर्षीय तरुणीने महिन्याभरात संपवलं जीवन

मयुरीच्या भावाने याबद्दलचे एक सीसीटीव्ही फुटेजदेखील दाखवले आहे. करिष्मा आणि शशांक हगवणेने माझ्या लेकीला सर्वाधिक त्रास दिल्याचा आरोप मयुरीच्या आईने केला आहे. हगवणेंच्या घराची मोठी सून असलेल्या मयुरी जगतापलाही प्रचंड त्रास दिला जात होता. वैष्णवीच्या लग्नानंतर हा त्रास अधिक वाढल्याचे जगताप कुटुंबाने प्रसार माध्यमांना सांगितले. लग्नानंतर सहा महिने हगवणे कुटुंब व्यवस्थित वागले. पण नंतर त्रास सुरू झाला. करिष्मा आणि शशांकने सर्वाधिक त्रास दिला. तिच्या मिस्टरांनी मात्र तिला कायम साथ दिली. ती 14 जानेवारीपासून आमच्याकडेच राहत आहे. तिचे मिस्टर आमच्या घरी येऊन तिला भेटतात. सासूबाई सुरुवातीला चांगल्या वागल्या. पण नंतर त्यांचंही वर्तन बदलले, असे मयुरीच्या आईने सांगितले आहे.

वैष्णवीला होत असलेल्या त्रासाची सुरुवातीला कल्पना नव्हती. पण सर्वात आधी या गोष्टींची सुरुवात माझ्या बहिणीपासून झाली, असे मयुरीच्या भावाने सांगितले. सुरुवातीला दोन वेळेस आम्ही त्यांच्या विरोधात (हगवणे कुटुंबाविरोधात) तक्रार दाखल केली. पण पोलिसात गेल्यावर त्यांच्या गावातील कोणीतरी मध्यस्थी करायचे. तिसऱ्या वेळीही तेच झाले. रात्रीच्या वेळी आम्हाला मयुरीचा फोन आला, तिला मारहाण झाली होती. त्यावेळी बहिणीने सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. तेव्हा शशांक हगवणेने तिचा मोबाईल घेऊन पळ काढला. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे. त्यावेळी मयुरी त्याच्यामागे रस्त्यावर पळत होती. कपडे फाटलेले असतानाही मयुरी शशांकच्या मागे पळत होती, अशी माहिती देत मयुरीच्या भावाने सीसीटीव्ही फुटेज दाखवले.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.