वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान
ठाणे, ता. २२ (बातमीदार) : स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने विश्वरत्न वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष - वीर सावरकर’ या विषयावर हे व्याख्यान होणार असून, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. उदय निरगुडकर असणार आहेत. बुधवार, २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयातील सरस्वती मंदिर, वा. अ. रेगे सभागृह, नेताजी सुभाष पथ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.