वैष्णवी हगवणेप्रकरणी पोलिसांनी अजून एक कारवाई केली आहे. वैष्णवी हगवणेच्या सासऱ्याला आणि दीराला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीला सासरच्यांकडून कौटुंबिक छळाचा सामना करावा लागला होता. यानंतर वैष्णवीचा नवरा, सासू अन् नणंदेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिचा सासरा आणि दीर फरार होते. आता पोलिसांना त्यांनाही शोधून काढले आहे.
बावधन पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आह. राजेंद्र हगवणे व त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही खेडेगावात लपून बसले होते. कालपासून पोलिसांच्या टीम हगवणे यांच्या शोधात होती. त्यानंतर आता सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणेला अटक करण्यात आली आहे.